Sanjay Raut: वेळ तीच...ठिकाणही तेच! संजय राऊत कोणता गौप्यस्फोट करणार?, शिवसेना भवनात दु. ४ वाजता पत्रकार परिषद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 15:24 IST2022-03-07T15:23:45+5:302022-03-07T15:24:34+5:30
शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिवसेना भवनात पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे. उद्या दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेत असल्याची माहिती संजय राऊत यांनी ट्विटर हँडलवर दिली आहे.

Sanjay Raut: वेळ तीच...ठिकाणही तेच! संजय राऊत कोणता गौप्यस्फोट करणार?, शिवसेना भवनात दु. ४ वाजता पत्रकार परिषद
मुंबई-
शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिवसेना भवनात पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे. उद्या दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेत असल्याची माहिती संजय राऊत यांनी ट्विटर हँडलवर दिली आहे. त्यामुळे आता संजय राऊत कुणाचा आणि कोणता घोटाळा बाहेर काढणार? नेमकी कोणती माहिती समोर आणणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
Will be addressing a press conference tomorrow 4 pm at shivsena bhavan.
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 7, 2022
Watch this space.
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/xVh8ToHaTs
संजय राऊत यांनी याआधीच मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आणखी एक मोठा घोटाळा बाहेर काढणार असल्याचं म्हटलं होतं. याच शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन ईडीचा सर्वात मोठा घोटाळा सर्वांसमोर उघड करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार आता संजय राऊत थेट ईडीबाब नेमके कोणते गौप्यस्फोट करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
"ईडीच्या चौकशांची भीती घालून सर्वांच्या कुंडल्या हातात असल्याचं हे किरीट सोमय्या सांगतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्याही कुंडल्या आमच्या हातात आहे आणि आम्ही आरोप सुरू केले तर एक दिवस असा नक्कीच येणार आहे की तुम्हाला या महाराष्ट्रातून तोंड काळ करून जावं लागेल", असं संजय राऊत म्हणाले होते.