मुंबई : बॉलीवूड माफिया, ड्रग्ज आणि सुरक्षेच्या मुद्यावरून अभिनेत्री कंगना रनौत आणि शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्यात सध्या चांगलीच जुंपली आहे. राऊत यांनी आपणास धमकी दिल्याचा आरोप करून कंगनाने खळबळ उडवून दिली. तर, तुझ्याकडे पुरावे असतील तर पोलिसांकडे जा, उगीच टिव्टिव करू नकोस, अशा शब्दांत खा. राऊत यांनी कंगनाला फटकारले.मुंबई पोलिसांचीच जास्त भीती वाटत असल्याचे सांगत केंद्र सरकार अथवा हिमाचल प्रदेशच्या पोलिसांची सुरक्षा हवी असल्याचे कंगनाने म्हटले होते. कंगनाच्या या टिष्ट्वटनंतर राऊतांनी तिला धारेवर धरले होते. मुंबईत राहून मुंबई पोलिसांवर आरोप करणे लाजिरवाणे आहे, असे सांगतानाच कंगनाला भीती वाटत असेल तर तिने मुंबईत परत येऊ नये, असा सल्ला राऊत यांनी दिला होता.
राऊतांनी धमकी दिली, कंगना रनौतचा आरोप, राऊत म्हणाले, मग पोलिसांकडे जा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 01:35 IST