Join us  

शिवसेनेसारखं काम इतर पक्षांना जमलं नाही, त्यामुळेच इतर राज्यात चिता पेटलेल्या दिसतायत: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2021 3:41 PM

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना महाराष्ट्रानं आणि विशेषत: मुंबईनं कोरोना विरोधात केलेल्या कामाचं सुप्रीम कोर्टानं कौतुक केलं. याच पार्श्वभूमीवर बोलत असताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारवर स्तुतीसुमनं उधळली.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना महाराष्ट्रानं आणि विशेषत: मुंबईनं कोरोना विरोधात केलेल्या कामाचं सुप्रीम कोर्टानं कौतुक केलं. याच पार्श्वभूमीवर बोलत असताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. तसेच शिवसेनेनं केलेल्या कामांचा दाखल देत शिवसेनेसारखं काम इतर पक्षांना जमलं नाही, त्यामुळेच इतर राज्यात आज आपल्याला चिता पेटलेल्या दिसत आहेत, असं विधान केलं आहे. ते मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. (sanjay raut praises shiv sena and cm uddhav thackeray over covid 19 management in state)

देशाच्या सुप्रीम कोर्टानं मुंबईच्या कोरोना लढ्याच कौतुक केलं. याबाबत संजय राऊत यांना विचारण्यात आलं असता त्यांनी शिवसेनेनं केलेल्या कामाचा दाखला दिला. "आम्ही आता देखील आदित्य ठाकरे यांच्यासोबत पुण्यात तीन कोरोना सेंटरचं उद्घाटन केलं. हे सरकारी सेंटर नाहीत. हे शिवसेनेच्या माध्यमातून उभारली आहेत. महाराष्ट्राची स्थिती आज चांगली का आहे? तर सरकारला समांतर अशी कोरोना केंद्र आणि यंत्रणा राजकीय कार्यकर्ते देखील उभारत आहेत. त्यामुळे सरकारवरील भार कमी होत आहे. हे इतर राज्यांत आजवर झालेलं नाही. अनेक राज्यांमध्ये शिवसेनेसारखं काम इतर पक्षांना जमलेलं नाही. त्यामुळे आज इतर राज्यांमध्ये चिता पेटलेल्या दिसत आहेत. आज कब्रस्तानमध्ये देखील जागा नाही. याचं हेच कारण आहे", असं संजय राऊत म्हणाले. 

'महाराष्ट्र मॉडेल'वरुन केलं मुख्यमंत्री ठाकरेंचं कौतुक"महाराष्ट्र पॅटर्न किंवा आज महाराष्ट्र मॉडेल असा संदर्भ दिला जात आहे. याचाच उल्लेख करुन सर्वोच्च न्यायालयानंही कौतुक केलं. त्याचबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील बोलत आहेत. महाराष्ट्राच्या कोरोना लढ्याचं कौतुक त्यांनी केलं आहे. महाराष्ट्रानं स्वत:ची लढाई स्वत:च्या बळावर निर्माण केली आणि लढली आहे. याचं श्रेय नक्कीच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांना जातं", असं संजय राऊत म्हणाले.  

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसउद्धव ठाकरे