ईडीने जप्त केलेल्या पटकथा मिळविण्यासाठी संजय राऊत न्यायालयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 09:16 IST2025-07-02T09:15:53+5:302025-07-02T09:16:23+5:30

कथित मेल फसवणूकप्रकरणी ईडीने  यापूर्वी राऊत यांच्या निवासस्थानी छापा टाकला होता. छाप्यादरम्यान राऊत यांनी स्वत: लिहिलेल्या आगामी चित्रपटांच्या स्क्रिप्टसह अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली होती.

Sanjay Raut moves court to retrieve screenplay seized by ED | ईडीने जप्त केलेल्या पटकथा मिळविण्यासाठी संजय राऊत न्यायालयात

ईडीने जप्त केलेल्या पटकथा मिळविण्यासाठी संजय राऊत न्यायालयात

मुंबई : ईडीने जप्त केलेल्या ‘ठाकरे-२’ या प्रस्तावित चित्रपटाची पटकथा आणि संबंधित कागदपत्रे मिळविण्यासाठी उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

कथित मेल फसवणूकप्रकरणी ईडीने  यापूर्वी राऊत यांच्या निवासस्थानी छापा टाकला होता. छाप्यादरम्यान राऊत यांनी स्वत: लिहिलेल्या आगामी चित्रपटांच्या स्क्रिप्टसह अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. या जप्त केलेल्या वस्तूंमध्ये ‘ठाकरे-२’ या प्रस्तावित चित्रपटाची अर्धवट लिहिलेल्या पटकथेचाही समावेश आहे. तसेच ज्येष्ठ समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्याही  जीवनावर आधारित चित्रपटाच्या पटकथेचा समावेश होता.

राजापुरात आढळले शिळेवर काेरलेले धनुष्यबाण; कोदवली नदीच्या काठी सापडला पुरातन ठेवा

ईडीने त्या पटकथाही आर्थिक अनियमिततेचा भाग आहे, असे गृहीत धरून त्यांच्या सर्जनशील आणि चित्रपटीय संदर्भाचा विचार न करता जप्त केली, असे  राऊत यांनी अर्जात म्हटले आहे.

Web Title: Sanjay Raut moves court to retrieve screenplay seized by ED

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.