BMC Elections 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. भाजपाने मुसंडी मारली आहे. ठाकरे बंधूंना मोठा झटका बसल्याचे दिसत आहे. निकाल जाहीर होत असतानाच राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक ट्विट करत निवडणूक निकालांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, मुंबई महापालिकेचा संपूर्ण निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. सध्या ६० ते ७५ प्रभागांची मतमोजणी अजूनही शिल्लक असून, आत्तापर्यंत जे आकडे दाखवले जात आहेत ते खोटे ठरतील, असा दावा त्यांनी केला आहे.
"निवडणूक लढत अत्यंत अटीतटीची असून शिवसेना आणि मनसे जोरदार टक्कर देत आहेत. मात्र, भाजपकडून जाणीवपूर्वक आकड्यांचा भ्रम पसरवला जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. दुपारनंतर शिवसेना आणि मनसेचे असंख्य उमेदवार विजयी झाले असतानाही, काही न्यूज चॅनेल्स जुनाच आकडा सातत्याने दाखवत असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांवरून राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, अंतिम निकालानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे. संजय राऊत यांच्या या ट्विटमुळे मुंबई महापालिकेच्या निकालावरून राजकीय खळबळ उडण्याची शक्यता आहे.
Web Summary : Sanjay Raut questions Mumbai's election results, alleging BJP spreads false numbers. He claims many wards' counting remains, and Shiv Sena is strongly competing. The final outcome is awaited amid political allegations.
Web Summary : संजय राउत ने मुंबई चुनाव परिणामों पर सवाल उठाया, भाजपा पर झूठे आंकड़े फैलाने का आरोप लगाया। उन्होंने दावा किया कि कई वार्डों की गिनती बाकी है, और शिवसेना कड़ी टक्कर दे रही है। राजनीतिक आरोपों के बीच अंतिम परिणाम का इंतजार है।