Sanjay Raut: विधानसभेतही डायलॉगबाजी, 'काय झाडी, काय डोंगार ओक्के; 50 खोके पक्के'
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 15:43 IST2022-07-03T15:42:27+5:302022-07-03T15:43:27+5:30
गोव्याहून बंडखोर आमदारांचे मुंबईत आगमन झाल्यानंतर भाजप नेत्यांनी त्यांचं स्वागत केलं.

Sanjay Raut: विधानसभेतही डायलॉगबाजी, 'काय झाडी, काय डोंगार ओक्के; 50 खोके पक्के'
मुंबई - शिंदेगटाच्या बंडखोर 50 आमदारांचे शनिवारी रात्री मुंबईत आगमन झाले. त्यानंतर, महाराष्ट्राच्या विधिमंडळात आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. यात भाजपचे राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. प्रस्तावाच्या बाजूने 164 तर प्रस्तावाच्या विरोधात 107 जणांनी मतदान केले. दरम्यान, या निवडीनंतर सभागृहात आणि सभागृहाबाहेरही चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली. बंडखोर आमदारांपैकी एक असलेल्या सांगोल्याच्या शहाजी बापू पाटील यांचा एक डायलॉग तुफान गाजला होता. त्यानंतर, या डायलॉगची आता विधानसभेतही चर्चा होताना दिसत आहे. काँग्रेस आमदाराने हा डॉयलॉग म्हणत बंडखोर आमदारांवर टिका केली आहे.
गोव्याहून बंडखोर आमदारांचे मुंबईत आगमन झाल्यानंतर भाजप नेत्यांनी त्यांचं स्वागत केलं. तर, गिरीश महाजन यांनी सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांना पाहताच चंद्रकांत पाटील यांना डोंगारफेम व्हायरल कॉलची आठवण करुन दिली. त्यावेळी, चंद्रकांत पाटलांसह इतरही भाजप नेत्यांना अतिशय आनंद झाला. शहाजी पाटील यांनी चक्क चंद्रकांत पाटील यांचे पाय धरले, त्यावेळी पाटील यांनीही शहाजी पाटील यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. आता, विधानसभेच्या विशेष अधिवेशनातही आमदांरांची बंडखोरी आणि शहाजा बापू पाटील यांचा डॉयलॉग चर्चेला आला आहे.
काँग्रेस आमदार कैलास गोरंटयाल यांचीही डायलॉगबाजी गाजली...काय झाडी,काय डोंगार,काय हाटेल..एकदम ओक्के....पचास खोके ओके. pic.twitter.com/Wen9H5W9vA
— Krishnat Patil (@patilkrishnat) July 3, 2022