Join us

अजित पवार हे तर नटसम्राट: संजय राऊत, अमित शाह भेटीवरून केली टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 06:12 IST

अजित पवार यांच्या वेषांतर नाट्यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे.   

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अजित पवार यांनी नवी दिल्लीत अमित शाह यांच्या भेटीसाठी मास्क आणि टोपी घालून विमानाने प्रवास केला. विमान प्रवासासाठी स्वतःचे नावही बदलले होते, अशी जाहीर कबुली दिली. त्यांच्या या वेषांतर नाट्यावर उद्धवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी अजित पवार नटसम्राट असल्याची टीका केली आहे.   

राऊत म्हणाले, महाराष्ट्रात रंगमंच व नाटकाची मोठी परंपरा आहे. पण, या नाट्यसृष्टीने अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दुर्लक्ष केलेले दिसते. यांनाही रंगमंचावर नाटकात सहभागी करून घेतले पाहिजे.  

टॅग्स :संजय राऊतअजित पवार