मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या आगामी महापौरपदाच्या निवडणुकीवरून राज्यातील राजकारण तापले आहे. "ज्या दिवशी मुंबईत भाजपचा महापौर बसेल, तेव्हा संपूर्ण मुंबई शोकसागरात बुडेल," अशा शब्दांत शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील भाषणाचा समाचार घेताना राऊत यांनी भाजपला इतिहासाची आठवण करून दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत भाजपचा महापौर बसवण्याचे जे विधान केले, त्यावर बोलताना राऊत म्हणाले की, "मोदींचे भाषण लिहिणाऱ्यांचा इतिहास कच्चा आहे. मुंबईत फक्त शिवसेना आहे आणि राहील. मुंबईकरांनी जे आकडे दिले आहेत, त्यावरून भाजपचा विजय झालेला नाही, हे स्पष्ट आहे."
नगरसेवकांची फोडाफोडी आणि 'लोहपुरुष' शिंदे एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना राऊत यांनी त्यांना उपरोधिकपणे 'लोहपुरुष' संबोधले. "एकनाथ शिंदे हे भाजपचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. अमित शाह त्यांना खांद्यावर घेऊन फिरतात, पण शिंदेंची चावी नक्की कोणाकडे आहे?" असा सवाल त्यांनी केला. तसेच कल्याण-डोंबिवलीत आमचा ११ नगरसेवकांचा गट लवकरच स्थापन होईल, असा दावाही त्यांनी केला.
मराठी पंतप्रधान होणार? देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यावर भाष्य करताना राऊतांनी एक मोठी गुगली टाकली. "देवेंद्र फडणवीस यांचे पाऊल दिल्लीत पडत असेल तर आनंदच आहे. आमच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत, आता मराठी माणूस पंतप्रधान होईल," असे सूचक विधान त्यांनी केले.
नारायण राणेंवर टीका करताना राऊत म्हणाले की, "राणे यांचे वय झाले आहे, त्यांची आता काळजी घेतली पाहिजे." तसेच ताज हॉटेलमधील भेटीगाठींवर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, "आम्ही जेवायला जातो, पण रणनीती मीडियासमोर सांगायची नसते. काँग्रेसचे नगरसेवक फुटणार नाहीत. महाराष्ट्राच्या राजकारणात आता खरी मजा येणार आहे."
Web Summary : Sanjay Raut predicts political turmoil over Mumbai's mayoral election, criticizing BJP and Eknath Shinde. He suggests BJP's victory is not assured, taunts Shinde, and hints at potential Marathi PM.
Web Summary : संजय राउत ने मुंबई के महापौर चुनाव को लेकर राजनीतिक उथल-पुथल की भविष्यवाणी की, भाजपा और एकनाथ शिंदे की आलोचना की। उन्होंने सुझाव दिया कि भाजपा की जीत सुनिश्चित नहीं है, शिंदे को ताना मारा, और संभावित मराठी पीएम का संकेत दिया।