Join us

Sanjay Raut Bail: 'संजय आमची लांब पल्ल्याची तोफ', उद्धव ठाकरेंकडून राऊतांचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 13:37 IST

Sanjay Raut Bail: 'केंद्रीय यंत्रणा पाळीव प्राण्याप्रमाणे वागत आहे.'

Sanjay Raut Bail: कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. 100 दिवसानंतर राऊत तुरुंगातून बाहेर आले. काल जामीन मिळाल्यानंतर आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊत यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांचे कौतुक आणि सत्ताधाऱ्यांवर टीका केली. 

'केंद्रीय यंत्रणा पाळीव प्राण्याप्रमाणे वागत आहे' उद्धव ठाकरे म्हणाले की, 'सर्वप्रथम संजयच्या धाडसाचे कौतुक. न्यायालयाने मान्य केले की, कारवाई चुकीची होती. केंद्रीय यंत्रणा पाळीव प्राण्याप्रमाणे वागत आहे. अंगावर जा म्हणलं की, जातायतं. केंद्रीय न्यायमंत्री किरेन रिजिजू यांची काही वक्तव्ये आली, न्यायव्यवस्था अंकित करण्याचा प्रयत्न होत आहे. हा गुन्हा होऊ शकतो की नाही, याची दखल न्यायदेवता घेईलच. न्यायालयाचा दुरुपयोग करुन अनेक पक्ष फोडले गेले, बेकायदेशीर अटक, खोट्या केसेस टाकल्या जात आहेत.'

'संजय आमची लांब पल्ल्याची तोफ' ते पुढे म्हणाले की, 'कालचा निर्णय म्हणजे, त्यांच्यासाठी मोठा दणका आहे. पण आता खोट्या केसमध्ये संजय राऊतांना गोवण्याचा प्रयत्न सुरू आहे. घाबरुन जे पक्षातून पळून गेले, त्यांच्यासाठीही हा मोठा धडा आहे. तोफ तोफच असते, ही मैदानात आणण्याची गरज नसते. संजय आमची लांब पल्ल्याची तोफ आहे.' 

टॅग्स :उद्धव ठाकरेसंजय राऊतशिवसेनाआदित्य ठाकरे