Join us
Daily Top 2Weekly Top 5

संजय राऊत यांनाही होती गुवाहाटीची ऑफर; माध्यमांसमोर केला दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 06:08 IST

स्वाभिमानाच्या गोष्टी करायच्या, हिंदुत्वाच्या गोष्टी करायच्या आणि अशा पद्धतीने वागायचे हे आमच्या रक्तात नाही.

मुंबई : त्यांनी मलाही गुवाहाटीला येण्याची ऑफर दिली होती, पण मी गेलो नाही उद्धव ठाकरेंसोबतच राहिलो, असा दावा शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना केला. 

स्वाभिमानाच्या गोष्टी करायच्या, हिंदुत्वाच्या गोष्टी करायच्या आणि अशा पद्धतीने वागायचे हे आमच्या रक्तात नाही. ‘प्राण जाये पर वचन न जाये’, हे बाळासाहेबांनी शिकवले आहे. मी याबाबतीत बेडर आहे. सत्य तुमच्या बाजूने असेल तर घाबरण्याचे कारण नाही. हे मी इतरांना सांगत असतो, असे सांगतानाच शिवसेनेत ‘डरना मना है’, असे राऊत म्हणाले.

सध्या ईडी चौकशीच्या फेऱ्यात असलेले राऊत म्हणाले की, कारण नसताना चौकशा होतात तेव्हा आपण या चौकशांना सामोरे गेले पाहिजे. अशा वेळी तू काही केले नाही असे आपला अंतरात्मा सांगत असतो.  त्याच आत्मविश्वासाने चौकशीला सामोरे गेलो.

टॅग्स :शिवसेनासंजय राऊतउद्धव ठाकरे