Sanjay Nirupam criticizes Milind Deora's resignation | मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्यावर संजय निरुपम यांची टीका
मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्यावर संजय निरुपम यांची टीका

मुंबई -  मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान, मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्यावर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी टीका केली आहे. मिलिंद देवरा यांनी दिलेला राजीनामा हा त्यांनी दिल्लीला जाण्यासाठी वापरलेली शिडी आहे, असा टोला निरुपम यांनी लगावला आहे. तसेच मुंबई काँग्रेससाठी अध्यक्षपदाऐवजी तीन सदस्यीय समिती नियुक्ती करण्याच्या दिलेल्या सल्ल्यावरही निरुपम यांनी टीका केली आहे. 

मुंबईकाँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा देताना त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत मुंबई शहर युनिटचे निरीक्षण करण्यासाठी तीन वरिष्ठ नेत्यांच्या सामूहिक नेतृत्वाची तात्पुरती स्थापना करण्याची शिफारस केली आहे. 

काँग्रेसमध्ये पुढील राष्ट्रीय भूमिका स्वीकारण्यासाठी देवरा दिल्लीत जाऊ शकतात. हा राजीनामा संदर्भातील एक पत्र नुकतेच देवरा यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे सुपुर्द केल्याची माहिती हाती आली आहे. महाराष्ट्रात काँग्रेससाठी भाजपा-शिवसेना आणि वंचित आघाडीच्या प्रभावाचा निषेध करणे हे काँग्रेससाठी एक मोठे आव्हान आहे, असे त्यांनी राजीनामा देताना स्पष्ट केले आहे. 

Web Title: Sanjay Nirupam criticizes Milind Deora's resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.