सॅनिटायझर कुठेही मिळणार, कोणीही विकू शकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 05:11 AM2020-08-03T05:11:37+5:302020-08-03T05:12:23+5:30

एफडीएचे नियंत्रण हटविले : भेसळ रोखणे होणार कठीण

Sanitizers can be found anywhere, anyone can sell | सॅनिटायझर कुठेही मिळणार, कोणीही विकू शकणार

सॅनिटायझर कुठेही मिळणार, कोणीही विकू शकणार

Next

अतुल कुलकर्णी

मुंबई : अल्कोहोल मिळत नाही म्हणून सॅनिटायझर पिल्यामुळे पंजाबमध्ये अनेकांचे जीव गेले, हे माहिती असताना केंद्र सरकारने आता हॅण्ड सॅनिटायझर विक्रीवरील नियंत्रण उठवले असून आता कोणीही, कुठेही विकू शकेल अशी परवानगी देणारा निर्णय घेतला आहे.

सॅनिटायझरमध्ये भेसळ होऊ नये म्हणून उत्पादन, वितरणाचा परवाना एफडीएकडूनच घ्यावा लागतो. परवानाधारकांनाच किरकोळ विक्री करता येते. एफडीएचे अधिकारी कधीही कारखाना किंवा दुकानात जाऊन गुणवत्ता तपासू शकतात. मात्र केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी एका आदेशान्वये सॅनिटायझर कुठेही विकता येईल, असा निर्णय घेतला. त्यामुळे आता सिग्नल, किराणा दुकान, टपरीवर हॅण्ड सॅनिटायझर विकले आणि त्यातून अनुचित प्रकार घडले तर यावर आमचे कसलेही नियंत्रण उरणार नाही. शिवाय भेसळीचा सुद्धा शोध घेता येणार नाही. हा अत्यंत दुर्दैवी निर्णय आहे, असे एफडीएच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. हॅण्ड सॅनिटायझरचा समावेश अत्यावश्यक वस्तू व सेवा कायद्यात करण्यात आला होता. १ जुलैपासून वगळण्यात आला. आता हॅण्ड सॅनिटायझरची उपलब्धता भरपूर आहे, त्यामुळे याच्या नियंत्रणाची गरज नसल्याचे सांगण्यात आले. मात्र २७ जुलैला नवा आदेश काढताना त्याच्या उलट भूमिका घेत, सॅनिटायझर सहज उपलब्ध व्हावे म्हणून हा निर्णय घेतला गेला, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.

मिथेनॉल आणि पिण्यास अयोग्य असणारी रसायने आदींपासून हॅण्ड सॅनिटायझर बनवले जाते. त्याचे बॅच नंबर, ते कोणी कोणाला विकले याचा ट्रॅक औषधाच्या दुकानातून ठेवता येत होता. आता हे बंधन असणार नाही. खोकल्याचे औषध प्रिस्क्रीप्शनवर देताना ते नशेसाठी सर्रास विकले जात होते. आता तर सॅनिटायझरच्या भेसळीवर नियंत्रणच उरणार नाही, हे भयंकर आहे. - महेश झगडे, माजी एफडीए आयुक्त

Web Title: Sanitizers can be found anywhere, anyone can sell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.