Join us

राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदी समीर भुजबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 08:18 IST

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते व मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. 

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून  बॅकस्टेजला राहून जबाबदारी पार पाडणाऱ्या समीर भुजबळ यांची बुधवारी राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) मुंबई अध्यक्षपदी निवड करण्यात आली. ते या पदाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी व्यक्त केला.

मुंबईतील गरवारे क्लब हाउस येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते व मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. 

टॅग्स :मुंबईराष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार