मृत कोंबड्यांच्या मांसाची शिवडीत विक्री, आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 02:51 AM2018-08-08T02:51:22+5:302018-08-08T02:51:50+5:30

मृत कोंबड्या कापून त्याचे मांस रस्त्यावरील चायनीज दुकानदारांना विकणाऱ्याला शिवडी येथून अटक करण्यात आली.

Sale of dead chickens in Sivadhi, arrested accused | मृत कोंबड्यांच्या मांसाची शिवडीत विक्री, आरोपीला अटक

मृत कोंबड्यांच्या मांसाची शिवडीत विक्री, आरोपीला अटक

googlenewsNext

मुंबई : मृत कोंबड्या कापून त्याचे मांस रस्त्यावरील चायनीज दुकानदारांना विकणाऱ्याला शिवडी येथून अटक करण्यात आली. ज्या कोंबड्या काही रोगामुळे मृत्युमुखी पडतात, त्यांचा वापर चायनीजमधील चिकनसाठी केला जात असल्याची धक्कादायक बाब यामुळे समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनंतर एफडीए व महापालिकेने संयुक्तपणे कारवाई करत, या प्रकाराचा पर्दाफाश केला आहे.
बाजारभावापेक्षा अत्यंत कमी दरात हे मांस उपलब्ध होत असल्याने, चायनीज गाड्यांचे चालक या चिकनला प्राधान्य देत होते. मुंबईत बाहेरून दररोज लाखो कोंबड्या आणल्या जातात. त्यापैकी अनेक कोंबड्या प्रवासादरम्यान किंवा आजारामुळे मृत्यू पावतात. त्या कोंबड्या कचºयामध्ये फेकणे आवश्यक असताना, त्यामधून आर्थिक लाभ मिळविण्याच्या हव्यासापोटी या मृत कोंबड्या शिवडीतील एका झोपडीमध्ये कापून, तिथून चायनीजच्या गाड्यांसाठी कच्चा माल म्हणून स्वस्तामध्ये पाठविल्या जात होत्या. अशा प्रकारे मृत कोंबड्यांचे मांस खाल्ल्याने विषबाधा किंवा इतर आजार होण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तविली आहे.
शिवडीतील एका अनधिकृत झोपडीत केलेल्या कारवाईमध्ये २५ किलो कुजलेले चिकन जप्त करण्यात आले. या प्रकाराबाबत रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
>मुंबईत बाहेरून दररोज लाखो कोंबड्या आणल्या जातात. अनेक कोंबड्या प्रवासादरम्यान वा आजारामुळे मृत्यू पावतात. बाजारभावापेक्षा अत्यंत कमी दरात मृत कोंबड्यांचे मांस उपलब्ध होत असल्याने, चायनीज गाड्यांचे चालक या चिकनला प्राधान्य देतात.

Web Title: Sale of dead chickens in Sivadhi, arrested accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.