Saif Ali Khan ( Marathi News ) : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर काल रात्री उशीरा हल्ला झाल्याची बातमी समोर आली. या बातमीमुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आज सैफ अली खानच्या बंगल्यातील आणि परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. या प्रकरणात आता पोलिसांना एक मोठा पुरावा सापडला आहे. पोलिसांना संशयीत आरोपी सैफच्या घरातून पायऱ्या उतरत असलेला एक सीसीटी फुटेज मिळाला आहे.
सैफ अली खान हल्लाप्रकरणी CM फडणवीसांची प्रतिक्रिया; विरोधकांनी घेरले, पण CM नेमकंच बोलले!
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सैफ अली खानवर हल्ला करणारा व्यक्ती चोरीच्या उद्देशाने फायर एग्झिटच्या पायऱ्यांवरुन घरात घुसला आणि कित्येकवेळ तिथेच उभा होता. इमारतीच्या १२ व्या मजल्यावर सैफ अली खान त्याच्या कुटुंबासह राहतो, त्याच इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित आरोपी कैद झाला आहे.
मुंबईतील पॉश परिसर असलेला वांद्रे परिसरातील अभिनेत्याच्या घरी पहाटे २.३० वाजता मुलांच्या खोलीत हा हल्ला झाला. घरातील नोकराने आरोपीला पाहिले आणि गोंधळ सुरू केला. आवाज ऐकून सैफ अली खान बाहेर आला आणि त्या दोघांमध्ये झटापट सुरू झाली. आरोपीने अभिनेत्यावर सहा वेळा चाकूने वार केले. घरकाम करणाऱ्या महिलेच्या हातालाही किरकोळ दुखापत झाली. अभिनेत्याला पाठीला गंभीर दुखापत झाली असून शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
पोलिसांचा मोठा खुलासा
घटनास्थळावरून पळून गेलेल्या संशयिताची ओळख पटली आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी दहा पथके तयार केली आहेत.
पोलिसांनी परीसरातील हल्ल्यावेळीचा सर्व पुरावे गोळा केले आहेत.या परिसरात यावेळी या भागात कोणते मोबाइल नेटवर्क सक्रिय होते हे पोलिसांना शोधण्यास मदत झाली. त्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सैफ अली खानच्या घरी चोरी आणि हल्ला करणारा व्यक्ती रेकॉर्डवरील गुन्हेगार असू शकतो.