Join us  

Sachin Vaze Arrested: सचिन वाझेंच्या अटकेनंतर भाजपा आक्रमक; शरद पवारांनीही दिली पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 11:38 AM

सचिन वाझे (Sachin Vaze) यांची नार्को टेस्ट केली जावी, अशी मागणी भाजपाचे नेते राम कदम यांनी केली आहे.

मुंबई: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके सापडल्याप्रकरणी तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze) यांना एनआयएने अटक केली आहे. एनआयएने सांगितल्यानुसार, सचिन वाझे यांना आईपीसीच्या कलम 286, 465, 473, 506(2), 120 बी आणि 4 (ए)(बी)(आय) स्फोटक वस्तू कलम 1908 अंतर्गत अटक करण्यात आली आहे.  (Antilia case: NIA arrests mumbai police officer API sachin vaze)

सचिन वाझेंच्या अटकेनंतर ठाण्यातून आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये इनोव्हा गाडीतून जाणारे दोन्ही चालक आणि एका व्यावसायिकाचा समावेश असल्याचे सांगितले जाते. 

सचिन वाझेंना केल्यानंतर भाजपा आणखीनच आक्रमक झाला आहे. या कटात सहभागी असलेल्या लोकांची नावे समोर येण्यासाठी सचिन वाझे यांची नार्को टेस्ट केली जावी, अशी मागणी भाजपाचे नेते राम कदम यांनी केली आहे. कर नाही त्याला डर कशाला पाहिजे. त्यामुळे सचिन वाझे यांची नार्को टेस्ट करून दूध का दूध पानी का पानी होऊ जाऊ दे. सचिन वाझे यांची नार्को टेस्ट झाली नाही तर ठाकरे सरकारचा खरा चेहरा लोकांसमोर येईल, असं राम कदम यांनी म्हटलं आहे. 

सचिन वाझेंनंतर ठाण्यातील एका नेत्याची चौकशी होणार?; मोठी घडामोड, राजकारणातही खळबळ

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील संबंधित प्रकरणाच्या चौकशीत जे काही सत्य बाहेर येईल, जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असं स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सचिन वाझे यांच्या अटकेवर बोलण्यास टाळलं आहे. माध्यमांनी सचिन वाझे यांच्या अटकेवर प्रश्न विचारला असता, तो स्थानिक विषय आहे. मी जास्त यावर भाष्य करणार नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. 

Sachin Vaze: वेळ नसल्यानं आईच्या अंत्यसंस्कारालाही गेले नव्हते सचिन वाझे; लहानपणासून पोलीस होण्याची इच्छा

तत्पूर्वी, सचिन वाझे यांना शनिवारी रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी अटक केल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली आहे. अटकेपूर्वी तब्बल 13 तास सचिन वाझे यांची एनआयएकडून चौकशी करण्यात आली. सचिन वाझे काल सकाळी 11 वाजताच एनआयएच्या कार्यालयात हजर झाले होते, तेव्हापासून त्यांची चौकशी सुरु होती. जवळपास 13 तासांच्या चौकशीअंती एनआयएने त्यांना अटक केली. आज (14 मार्च) सकाळी 11 च्या सुमारास त्यांना कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे. गेल्या 15 दिवसांत अंबानी स्फोटके प्रकरणातही सगळ्यात मोठी घडामोड म्हणून पाहिली जातेय, त्यामुळेच सचिन वाझेंच्या अटकेनं खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे सचिन वाझेंनी याआधीच न्यायालयात धाव घेत अंतरिम जामीनासाठी प्रयत्न केले होते. मात्र, न्यायालयाने प्रथमदर्शी अर्जदाराविरोधात पुरावे दिसत असल्याचं निरिक्षण नोंदवलं. तसेच या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची गरज असल्याचं म्हणत हा जामीनाचा अर्ज फेटाळला. यावेळी न्यायालयाने तपास संस्थांचं मत महत्त्वाचं असल्याचं म्हटलं होतं.

सचिन वाझेंचं व्हॉट्सअॅप स्टेटस

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) यांची बदली झाल्यानंतर त्यांचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस लक्ष वेधून घेत होतं. जगाला आता गुडबाय करायची वेळ जवळ आली आहे, असं सूचक स्टेटस वाझेंनी ठेवल्यामुळे खळबळ उडाली होती.  

Sachin Vaze: जगाचा निरोप घेण्याची वेळ जवळ येत आहे; सचिन वाझेंच्या स्टेटसने खळबळ

अर्णब यांच्या अटकेसाठी ‘त्या’ स्कार्पिओचा वापर -

साहाय्यक निरीक्षक सचिन वाझे यांच्याकडील चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येत आहे. हिरेन यांच्या महिंद्रा स्कॉर्पिओचा वापर सुमारे चार महिन्यांपूर्वी अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवेळी (4 नोव्हेंबर) करण्यात आला होता. 25 फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ जिलेटिनच्या कांड्या असलेली कार सापडली होती. ती तेव्हा वाझे यांच्याकडे होती. याच गाडीतून अर्णब गोस्वामी यांच्या घरी ते गेले होते. मात्र त्या वेळी या स्कॉर्पिओला अन्य नंबर प्लेट लावली होती, असे सूत्रांकडून सांगण्यात येते.

टॅग्स :शरद पवारसचिन वाझेमहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकार