Join us
Daily Top 2Weekly Top 5

वैमानिकांच्या मद्य चाचणीचे नियम अधिक कडक, व्हिडीओ रेकॉर्डिंगही होणार; डीजीसीएचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 05:33 IST

सध्याच्या नियमावलीनुसार वैमानिक व केबिन कर्मचारी विमानात चढण्यापूर्वी तसेच विमान उड्डाण पूर्ण झाल्यानंतर त्यांची मद्यप्राशन चाचणी करण्यात येते.

मुंबई : डीजीसीएने वैमानिकांच्या मद्यप्राशन चाचणीचे नियम अधिक कठोर केले असून या चाचणीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्याचे आदेश यंत्रणांना दिले आहेत. तसेच, हे व्हिडीओ रेकॉर्डिंग किमान ६ महिने जतन करून ठेवण्याचे आदेशही डीजीसीएने दिले आहेत.

सध्याच्या नियमावलीनुसार वैमानिक व केबिन कर्मचारी विमानात चढण्यापूर्वी तसेच विमान उड्डाण पूर्ण झाल्यानंतर त्यांची मद्यप्राशन चाचणी करण्यात येते.

संरक्षक कठड्याचा भाग का कोसळला? समिती शोधणार कामाची गुणवत्ता, देखरेख, नियमावलींची तपासणी

२४ तासांच्या आत अहवाल

या चाचणीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करतानाच जर वैमानिकाने मद्यप्राशन केल्याचे आढळल्या किंवा ही चाचणी वैमानिक अथवा केबिन कर्मचारी पास करू शकला नाही तर त्याचा अहवाल २४ तासांच्या आत सादर केला जाईल.

दंड- समुपदेशन- निलंबन अशा शिक्षेच्या पातळ्या

 वैमानिक मद्यप्राशन चाचणीमध्ये सकारात्मक आढळून आला तर त्याच्यावर कोणती कारवाई करायची यासंदर्भात नव्या आदेशात उल्लेख आहे.

वैमानिक वा केबिन कर्मचाऱ्याला आर्थिक दंड लावणे, त्याचे समुपदेशन करणे ते त्याचे निलंबन अशा शिक्षेच्या पातळ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.  आपल्या ड्यूटीच्या आधी १२ तास वैमानिकाने मद्यप्राशन करू नये, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.

इंडिगोमध्ये लवकरच हजार वैमानिकांची भरती

डीजीसीएने वैमानिक आणि केबिन कर्मचाऱ्यांसाठी वेळापत्रक जारी केले आहे. यामुळे मनुष्यबळाअभावी विमान सेवेला फटका बसू नये, याकरिता इंडिगो कंपनीने एक हजार वैमानिकांच्या भरतीचा निर्णय घेतला आहे.

प्रशिक्षणार्थी वैमानिक, वरिष्ठ फर्स्ट ऑफिसर आणि कॅप्टन ही पदे भरली जातील. कंपनीच्या ताफ्यात ए-३२० विमानांची संख्या लक्षणीय आहे. त्यांचीदेखील भरती करण्यात येईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Pilots' alcohol test rules tightened; video recording mandatory: DGCA orders

Web Summary : DGCA strengthens pilots' alcohol testing, mandating video recording for at least six months. Violators face penalties, counseling, or suspension. Pilots cannot consume alcohol 12 hours before duty. IndiGo plans to recruit 1,000 pilots due to new scheduling rules.
टॅग्स :विमानवैमानिक