एलईडी-झेनॉन हेडलाइट्सचा डोळ्यांना त्रास; ४२१ वाहनांवर बडगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 10:24 IST2026-04-03T10:24:00+5:302026-04-03T10:24:00+5:30

मुंबई सेंट्रल, बोरीवली आणि ठाणे आरटीओने तीन लाखांपेक्षा अधिकचा दंड ठोठावला

RTO Crackdown 421 Vehicles Penalized in Mumbai and Thane for Illegal LED and Neon Lights | एलईडी-झेनॉन हेडलाइट्सचा डोळ्यांना त्रास; ४२१ वाहनांवर बडगा

एलईडी-झेनॉन हेडलाइट्सचा डोळ्यांना त्रास; ४२१ वाहनांवर बडगा

मुंबई: रिक्षा, कार, दुचाकी तसेच मालवाहू वाहनांवर चित्रविचित्र एलईडी-निऑन, झेनॉन लायटिंग बसवण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. परिणामी, रात्रीच्या वेळी पादचारी, दुचाकीस्वार आणि समोरून येणाऱ्या वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. अशा ४२१ वाहनांवर कारवाई करत मुंबई सेंट्रल, बोरीवली आणि ठाणे आरटीओने तीन लाखांपेक्षा अधिकचा दंड ठोठावला आहे.

नियमांनुसार लो-बीम हेडलाइट्सची मर्यादा दोन हजार लुमिनस आणि हाय-बीम तीन हजार ते तीन हजार ६०० लुमिनस इतकी आहे. वाहन चालवताना अपघाताचा धोका वाढतो. यासाठी अनधिकृतपणे वाहनांवर लावण्यात येणाऱ्या प्रखर हेडलाइटची तपासणी करण्याची तसेच विक्री करणाऱ्या दिनाची मोहीम आणखी कठोर राबविण्याची मागणी होत आहे.

कारवाई अत्यंत तुटपुंजी 

एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत असे दिवे बसविलेल्या वाहनचालकांवर आरटीओ कार्यालयांकडून तुटपुंजी कारवाई झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. वाहनांवर लावण्यात येणाऱ्या या प्रखर प्रकाशामुळे डोळे दीपतात, दृष्टी काही क्षणांसाठी कमजोर होते.

निर्बंध नसल्याने बाजारात सर्रास विक्री

बाजारात अनेक दुकानदार आणि ऑनलाइन पोर्टल्सवरून आरटीओ-अनधिकृत झगमगाट करणारे एलईडी आणि झेनॉन हेडलाइट्स सहज उपलब्ध आहेत. या विक्रीवर कोणतेही ठोस निर्बंध नाहीत. वाहनधारक त्याचा 'स्टायलिश' वापर करताना इतरांच्या सुरक्षेला धोका पोहोचवत आहेत. उत्पादक आणि वितरकांवर कोणतीही जबाबदारी निश्चित नसल्याने बाजारपेठ नियमबाह्य उपकरणांनी भरली आहे.

'आरटीओ'निहाय दंडवसुली अशी...

बोरीवली आरटीओ २५२ वाहनांची तपासणी, ८४ वाहनांवर ७७ हजार दंड 

ठाणे आरटीओ ४०६ वाहनांना २.१९ लाख रुपयांचा दंड

मुंबई सेंट्रल आरटीओ १६९ वाहनांवर सुमारे एक लाखांचा दंड

ठरावीक 'लुमेन्स'चे दिवे बसवा ! 

वाहन निर्मात्यांनी ठरावीक लुमेन्स (प्रकाशमान) मर्यादित हेडलाइट बसविणे आवश्यक असते. अतिरिक्त एलईडी, झेनॉन किंवा हाय-इंटेन्सिटी डिस्चार्ज लाइट आरटीओ प्रमाणित नसतील तर ते बसविणे बेकायदा आहे. रात्रीच्या वेळी 'डीपर' मोडमध्ये लाइट ठेवणे आवश्यक आहे. समोरून वाहन येत असल्यास हाय बीम टाळणे बंधनकारक आहे.

मानकांचे उल्लंघन 

वाहन कंपन्यांनी बसविलेले मूळ हेडलाइट वाहनचालक बदलतात. एलईडी-ड्रोनॉन हेडलाइटची अनेक दुकानांमध्ये सर्रास विक्री केली जाते. अशा हेडलाइट मानकांचे उल्लंघन करणारे असल्याने त्यांचा इतरांना त्रास होतो. मोटार वाहन कायद्यातील कलम १७७ नुसार प्रखर हेडलाइट वापरणाऱ्या चालकांना ५०० ते एक हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.

Web Title : एलईडी हेडलाइट्स से परेशानी: 421 वाहनों पर कार्रवाई

Web Summary : मुंबई में चकाचौंध एलईडी/जेनॉन हेडलाइट्स के इस्तेमाल पर 421 वाहनों पर ₹3 लाख से अधिक का जुर्माना लगाया गया, जिससे अन्य ड्राइवरों और पैदल चलने वालों को असुविधा और दृष्टि संबंधी समस्याएं हो रही हैं। नियमों के बावजूद आसानी से उपलब्ध ये लाइटें अत्यधिक चमक और रोशनी मानकों के उल्लंघन के कारण सुरक्षा जोखिम पैदा करती हैं, जिससे सख्त प्रवर्तन की मांग हो रही है।

Web Title : LED Headlights a Nuisance: Action Taken Against 421 Vehicles

Web Summary : Mumbai authorities fined 421 vehicles over ₹3 lakh for using dazzling LED/xenon headlights, causing discomfort and vision issues for other drivers and pedestrians. These lights, readily available despite regulations, pose safety risks due to excessive brightness and violation of luminosity standards, prompting calls for stricter enforcement.