Join us

सामूहिक  वैमनस्य पसरविणा-यांना  कठोर शिक्षा द्या - रिजवानूर रहमान खान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 20:54 IST

१०० हून अधिक लोकांना अटक करण्यात आलेल्या पोलिसांच्या कृत्याबद्दल समाधान

 

मुंबई : पालघर जिल्ह्यात दोन साधूंसह तीन जणांच्या जमावबंदीमुळे निर्माण झालेला सांप्रदायिक तणाव हा निषेधार्ह व निंदनीय आहे. दोन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करणा-या सरकारची  कृती स्वागतार्ह आहे, अशी प्रतिक्रिया  जमात ए इस्लामी हिंद महाराष्ट्रचे अध्यक्ष रिज़वान-उर-रहमान खान  यांनी दिली आहे. या प्रकरणातील १०० हून अधिक लोकांना अटक करण्यात आलेल्या पोलिसांच्या कृत्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करीत दोषींना कडक शासन देण्याची मागणी केली आहे.

ते म्हणाले की, ही एक दुर्दैवी घटना होती. माननीय खान म्हणाले की, केंद्रात भाजपा नेतृत्वाखालील एनडीएचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मॉब लिंचिंगमध्ये वाढ झाली आहे. महाराष्ट्राची एक वेगळी संस्कृती आहे आणि कमीतकमी या द्वेषपूर्ण मानसिकतेचा परिणाम झाला होता. मी राज्यातील महा विकास आघाडी सरकारला विनंती करतो की, समाजात किंवा मीडियामध्ये असो की सोशल मीडियावर या हेट मॉन्गर्सचा शोध घ्यावा, त्यांना द्वेष आणि वैर भावना पसरविण्याची आणि कायदा हातात घेणयाची शिक्षा द्या. 

टॅग्स :गुन्हेगारीपालघरमहाराष्ट्र