Join us
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्ती दिवशीच एसटी कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2020 02:23 IST

ST employees : सूचनांची अंमलबजावणी केल्यास आपापल्या स्तरावर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशीच निवृत्तीवेतन सुरू करता येईल.

मुंबई : सेवानिवृत्तीच्या दिनांकाच्या दिवशीच कर्मचाऱ्यांना कर्मचारी निवृत्तिवेतन सुरू करा, असे आदेश एसटी महामंडळाने दिले आहेत.सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकाच्या दिवशी कर्मचारी निवृत्तिवेतन सुरू करावे, असे भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने म्हटले आहे. त्यासाठी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे दावे सेवानिवृत्तीपूर्वीच भविष्य निर्वाह निधी कार्यालयाला सादर होणे आवश्यक आहे. तसेच कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळण्यास उशीर होऊ नये. सूचनांची अंमलबजावणी केल्यास आपापल्या स्तरावर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशीच निवृत्तीवेतन सुरू करता येईल. त्यासाठी पुढील तीन महिन्यांत सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी संकेतस्थळावर भरायला हवा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.

टॅग्स :एसटीकर्मचारी