मुंबई विद्यापीठाच्या २० परीक्षांचे निकाल जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2020 11:45 AM2020-10-24T11:45:25+5:302020-10-24T11:46:03+5:30

परीक्षेला २५,६८२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २४,५०७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. विद्यापीठाच्या http://www.mumresults.in/ या संकेतस्थळावर निकाल जाहीर करण्यात आला.

Results of 20 examinations of Mumbai University announced | मुंबई विद्यापीठाच्या २० परीक्षांचे निकाल जाहीर

मुंबई विद्यापीठाच्या २० परीक्षांचे निकाल जाहीर

Next

मुंबई :मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या अंतिम वर्ष किंवा सत्राच्या नियमित आणि बॅकलॉगच्या २० परीक्षांचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले. या परीक्षेत २२ हजार ६५३ विद्यार्थी यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले.

परीक्षेला २५,६८२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २४,५०७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. विद्यापीठाच्या http://www.mumresults.in/ या संकेतस्थळावर निकाल जाहीर करण्यात आला.

तृतीय वर्ष बीकॉम सत्र ५ (सीबीसीएस)चा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या परीक्षेचा निकाल ९४.३६ टक्के लागला. यासह बीकॉम अकाउंट ॲण्ड फायनान्स सत्र ६ (सीबीएसजीएस) व नॉन सीबीएसजीएस, बीकॉम अकाउंट ॲण्ड फायनान्स सत्र ५ (सीबीएसजीएस) व नॉन सीबीएसजीएस, बीकॉम बँकिंग ॲण्ड इन्श्युरन्स सत्र ६ (सीबीएसजीएस) व नॉन सीबीएसजीएस, बीकॉम बँकिंग ॲण्ड इन्श्युअरन्स सत्र ५ (सीबीएसजीएस), बीफार्म सत्र ७ (चॉईस बेस्ड), टीवाय बीए कलिनरी आर्ट सत्र ५ (सीबीसीएस), टीवाय बीए कलिनरी आर्ट सत्र ६ (सीबीसीएस), बीफार्म सत्र ८ (सीबीएसजीएस), बीफार्म सत्र ७ (सीबीएसजीएस), बी-व्होक टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट सत्र  ५ (सीबीएसजीएस ७५:२५), बी-व्होक रिटेल मॅनेजमेंट सत्र ५ (सीबीएसजीएस ७५:२५), टीवाय बीकॉम इन्वेस्टमेंट मॅनेजमेंट सत्र 
५ (चॉईस बेस्ड), टीवाय बीकॉम ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सत्र ५ (चॉईस बेस्ड), टीवाय बीकॉम फायनान्शिअल मॅनेजमेंट सत्र ५ (चॉईस बेस्ड), बीएस्सी एव्हिएशन सत्र ५ (सीबीसीएस), टीवाय बीकॉम/ बीएमएस एन्व्हार्यमेंटल मॅनेजमेंट ॲण्ड इकोनॉमिक्स सत्र ५ (चॉईस बेस्ड) आणि बॅचलर ऑफ सोशल वर्क सत्र ५ (सीबीसीएस), तृतीय वर्ष बॅचलर ऑफ आर्किटेक्चर टर्म १ आणि टर्म २ अशा एकूण २० परीक्षांचे निकाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील http://www.mumresults.in/ यावर प्रसिद्ध करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे.


गुण अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू
महाविद्यालयांकडून पोर्टलवर गुण अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू असून, उर्वरित इतर परीक्षांचेही निकाल जलदगतीने लावण्यासाठी विद्यापीठाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.
 

Web Title: Results of 20 examinations of Mumbai University announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.