मोफत, दर्जेदार आरोग्यसेवा देण्याचा संकल्प : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 11:57 IST2026-03-28T11:57:00+5:302026-03-28T11:57:54+5:30

सायन येथील रुग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन

resolved to provide free quality healthcare said cm devendra fadnavis | मोफत, दर्जेदार आरोग्यसेवा देण्याचा संकल्प : मुख्यमंत्री

मोफत, दर्जेदार आरोग्यसेवा देण्याचा संकल्प : मुख्यमंत्री

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा देण्याचा राज्य सरकारचा संकल्प असून त्यासाठी व्यवस्था उभारल्या जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

फडणवीस यांच्या हस्ते सायन रुग्णालयाच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा शुक्रवारी पार पडला. यावेळी ते बोलत होते झाले. तसेच यावेळी बॅटरीवर चालणाऱ्या ई-रुग्णवाहिकेचे (बग्गी) लोकार्पण करण्यात आले.

मुख्यमंत्री म्हणाले, मुंबईकरांसाठी हे रुग्णालय गरजेचे असून ७० खाटांपासून सुरू झालेले हे रुग्णालय आज १,८०० खाटांवर पोहोचले आहे.

अडीच हजार कोटी रुपये खर्चुन ३,२८६ खाटांचे नवीन रुग्णालय उभारण्यात येणार आहे.

खाटांची क्षमता दुप्पट

पुनर्विकासानंतर रुग्णालयातील खाटांची क्षमता दुप्पट होऊन ती ३,२८६ इतकी होणार आहे. अडीच हजार कोटी खर्च करून हे काम केले जात असून, या कामामुळे आधुनिक रूपात हे रुग्णालय रुग्णसेवेसाठी सज्ज होणार आहे.

कॅन्सर रुग्णांच्या उपचारासाठी स्वतंत्र इमारत उभारल्याने इतर रुग्णालयावरील ताण कमी होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी महापौर रितू तावडे, आ. तमिल सेल्वन, आ. सुनील शिंदे, आ. कालिदास कोळंबकर, आ. प्रसाद लाड, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, उपमहापौर संजय घाडी, आयुक्त भूषण गगराणी उपस्थित होते.

असे असेल रुग्णालय

रुग्णालयात २५ मजली निवासी टॉवर, १३ मजली कॅन्सर केअर सुविधा, १५ मजली मुख्य इमारत, १४ मजली आपत्कालीन विभाग, १३ मजली बाह्यरुग्ण विभाग आणि ४० हून अधिक ऑपरेशन थिएटर. तसेच एमआरआय, सीटी स्कॅनसह अत्याधुनिक निदान सुविधा.

रुग्णांना मोठा लाभ : महापौर

महापौर रितू तावडे यांनी हा पुनर्विकास केवळ इमारतीचा पुनर्विकास नसून, आरोग्य सुविधांना नव्या युगात नेत असल्याची भूमिका मांडली. तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय निधीचा रुग्णांना मोठा लाभ झाल्याचे त्या म्हणाल्या. अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे म्हणाले, १९४७ मध्ये स्थापना झालेले हे रुग्णालय ७७ वर्षांपासून रुग्णसेवेत असून अधिक सक्षम आरोग्यसेवा देण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा आहे.
 

Web Title : मुफ्त, गुणवत्तापूर्ण स्वास्थ्य सेवा का वादा: मुख्यमंत्री ने अस्पताल उन्नयन की घोषणा की

Web Summary : राज्य सरकार मुफ्त, गुणवत्तापूर्ण स्वास्थ्य सेवा प्रदान करने के लिए प्रतिबद्ध है। मुख्यमंत्री फडणवीस ने सायन अस्पताल के पुनर्विकास का उद्घाटन किया, जिसमें आधुनिक सुविधाओं और एक समर्पित कैंसर विंग के साथ बिस्तरों की संख्या 3,286 तक बढ़ाई गई। इस उन्नयन से मरीजों को काफी लाभ होगा।

Web Title : Free, Quality Healthcare Promised: Chief Minister Announces Hospital Upgrade

Web Summary : The state government is committed to providing free, quality healthcare. Chief Minister Fadnavis inaugurated the Sayon Hospital redevelopment, expanding beds to 3,286 with modern facilities, including a dedicated cancer wing. This upgrade will significantly benefit patients.