प्रदेश काँग्रेसमध्ये फेरबदल; ९ जिल्हाध्यक्षांना बदलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 04:38 IST2020-06-25T04:38:34+5:302020-06-25T04:38:55+5:30

प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नव्या जिल्हाध्यक्षांची निवड जाहीर केली आहे.

Reshuffle in the State Congress; 9 District Presidents changed | प्रदेश काँग्रेसमध्ये फेरबदल; ९ जिल्हाध्यक्षांना बदलले

प्रदेश काँग्रेसमध्ये फेरबदल; ९ जिल्हाध्यक्षांना बदलले

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने संघटनात्मक फेरबदल केले असून नऊ जिल्हा व शहर अध्यक्ष बदलण्यात आले आहेत. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नव्या जिल्हाध्यक्षांची निवड जाहीर केली आहे.
काँग्रेसच्या लातूर जिल्हाध्यक्षपदी श्रीशैल मल्लिकार्जुन उटगे तर शहर अध्यक्षपदी अ‍ॅड. किरण जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार डॉ. कल्याण काळे तर शहर अध्यक्षपदी मोहम्मद हिशम उस्मानी यांची नियुक्ती करण्यात आली. ठाणे शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. विक्रांत चव्हाण, भंडारा जिल्हा अध्यक्षपदी मोहन विठ्ठलराव पंचभाई तर गोंदिया जिल्हाध्यक्षपदी डॉ. नामदेव दासाराम किरसन, चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी प्रकाश देवतळे, तर शहराध्यक्षपदी रितेश तिवारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

Web Title: Reshuffle in the State Congress; 9 District Presidents changed