कर्जवाटप न करणाऱ्या अधिकाऱ्यांना हजर करा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 02:40 AM2020-06-09T02:40:45+5:302020-06-09T02:40:54+5:30

मुख्यमंत्री संतापले; खरिपाचा घेतला आढावा

Report to non-loan officers, order by cm | कर्जवाटप न करणाऱ्या अधिकाऱ्यांना हजर करा

कर्जवाटप न करणाऱ्या अधिकाऱ्यांना हजर करा

Next

मुंबई : शेतकºयांना पीककर्ज मिळत नाही अशी तक्रार येता कामा नये. ज्या व्यापारी/ राष्ट्रीयकृत बँका कर्ज वाटपाबाबत उदासीन आहेत. त्यांच्या प्रमुखांना तत्काळ इकडे हजर करा, या शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी बँकांची कानउघाडणी केली.

खरीप हंगामाबाबत आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. या हंगामासाठी ४५ हजार ७८५ कोटी रुपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यापैकी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना १३,५२४ कोटी रुपये उद्दिष्ट आहे. त्यातील ६,२५८ कोटी रुपयांचे ११ लाख शेतकºयांना या बँकांनी वाटप केले आहे. राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका आणि ग्रामीण बँकांना ३२,२६१ कोटी रुपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना त्यांनी केवळ ७ टक्के म्हणजे २,३०० कोटी रुपयांचे कर्जवाटप १,७५,००० शेतकºयांना केले आहे, अशी माहिती आजच्या बैठकीत देण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी व्यापारी बँकांच्या उदासीनतेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आणि या बँकांच्या प्रमुख अधिकाºयांना एक-दोन दिवसांत बोलावून जाब विचारा, असे निर्देश दिले. बैठकीत कृषि मंत्री दादाजी भुसे, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, मुख्य सचिव अजोय मेहता, कृषि सचिव एकनाथ डवले, सहकार विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला आदी सहभागी झाले.

४७ हजार ८९ शेतकरी गट
खते व बी बियाणे बांधावर पुरविण्यासाठी ४७ हजार ८९ शेतकरी गट तयार करण्यात आले असून १ लाख ५५ हजार ७५५ मेट्रिक टन खत, ८६ हजार १२६ मेट्रिक टन बियाणे , १ लाख ८० हजार ४८१ कापूस बियाणे पाकिटे बांधावर देण्यात आली आहेत. एकूण ५ लाख २७ हजार ४८३ शेतकºयांनी याचा लाभ घेतला आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

Web Title: Report to non-loan officers, order by cm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.