बंद झालेल्या मोबाइल क्रमांकाची माहिती द्या; दूरसंचार कंपन्यांना निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 08:13 AM2019-11-25T08:13:49+5:302019-11-25T08:14:08+5:30

कायमस्वरुपी बंद झालेल्या मोबाइल क्रमांकाची यादी दर महिन्याला संकेतस्थळावर जाहीर करण्याचे निर्देश भारतीय दूरसंचार नियामक आयोगाने दूरसंचार कंपन्यांना दिले आहेत.

Report a closed mobile number; Instructions to telecommunications companies | बंद झालेल्या मोबाइल क्रमांकाची माहिती द्या; दूरसंचार कंपन्यांना निर्देश

बंद झालेल्या मोबाइल क्रमांकाची माहिती द्या; दूरसंचार कंपन्यांना निर्देश

Next

मुंबई : कायमस्वरुपी बंद झालेल्या मोबाइल क्रमांकाची यादी दर महिन्याला संकेतस्थळावर जाहीर करण्याचे निर्देश भारतीय दूरसंचार नियामक आयोगाने दूरसंचार कंपन्यांना दिले आहेत. त्यामुळे मोबाइल क्रमांक बंद केलेल्या ग्राहकांची माहिती संबंधित यंत्रणांना मिळू शकेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

कायमस्वरुपी बंद झालेल्या मोबाइल क्रमांकाची यादी दर महिन्याला संकेतस्थाळवर जाहीर केल्यास बंद असलेले क्रमांक कंपन्यांना त्वरित कळतील. सध्या अनेक कंपन्या, बँका, विमा कंपन्यांमध्ये ग्राहकांचा मोबाइल क्रमांक नोंदवण्यात येतो व त्यावर वन टाईम पासवर्ड पाठवून सेवा पुरवली जाते. अनेकदा ग्राहकांचा हा क्रमांक बंद केला जातो, मात्र संबंधित बँक, विमा कंपन्या किंवा इतरांना याबाबत माहिती मिळत नाही.

परिणामी त्यांच्याकडे जुना क्रमांक नोंद असल्याने त्यावर सर्व माहिती पाठवली जाते किंवा संपर्क साधला जातो. अनेकदा यामध्ये कंपन्यांची फसवणूक होण्याचीदेखील भीती असते. हे प्रकार गेले अनेक महिने सुरू असल्याचे ट्रायच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे फसवणुकीची भीती टाळता यावी तसेच असे प्र्रकार रोखण्यासाठी दूरसंचार कंपन्यांनी अशा प्रकारे बंद झालेले मोबाइल क्रमांक संकेतस्थळावर जाहीर करण्याचे निर्देश दूरसंचार कंपन्यांना दिले आहेत.

दूरसंचार कंपन्यांनी या निर्देशांचे काटेकोरपणे पालन केल्यास संबंधित कंपन्यांना त्यांच्या ग्राहकांचा क्रमांक बंद झाला असल्यास त्याची माहिती मिळणे शक्य होणार आहे. ही माहिती मिळाल्यामुळे साहजिकच तो क्रमांक दुसऱ्या ग्राहकाला दिल्यास कोणतीही अडचण येणार नाही असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

जर ग्राहकांनी कंपन्यांमध्ये बदललेला क्रमांक नोंदवला नाही तर अशावेळी ग्राहकांचा जुना मोबाइल क्रमांक बंद झाल्याची माहिती मिळाल्यावर संबंधितांशी संपर्क साधून नवीन क्रमांक नोंदवण्यासाठी सांगता येईल.

Web Title: Report a closed mobile number; Instructions to telecommunications companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.