Replacement of another officer in that important position | ‘त्या’ महत्त्वाच्या जागेवर दुसऱ्याच अधिकाऱ्याची बदली

‘त्या’ महत्त्वाच्या जागेवर दुसऱ्याच अधिकाऱ्याची बदली

मुंबई : प्रादेशिक परिवहन विभागातील (आरटीओ) बढती आणि बदल्यांसाठी अर्थकारण करणाºया वर्ध्याच्या अधिकाºयाने पुन्हा मुंबई वाºया सुरू केल्या. नुकतीच पिंपरी-चिंचवड येथे उपप्रादेशिक पदावर एका अधिकाºयाची बदली झाली. विनंतीवरून ती केल्याचा आदेशात उल्लेख आहे. मात्र पदोन्नतीची यादी तयार असताना घाईत बदलीचे आदेश काढण्यात आले. तीही एकाच अधिकाºयाची बदली करण्यात आली. या बदलीसाठी मोठे अर्थकारण झाल्याची परिवहन विभागात (आरटीओ) चर्चा सुरू आहे.

आरटीओतील बदली आणि बढती अर्थकारणाच्या ‘गीअर’वर होत असून पदे रिक्त असतानाही बढतीला ब्रेक लागला आहे, अशा आशयाचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. एक अधिकारी मुंबईत दर मंगळवारी आणि बुधवारी बढती, बदलीचे नाव निश्चित करण्यासाठी येतो, याचा पर्दाफाशही करण्यात आला होता. त्यानंतर त्याने विमानाने पलायन केले होते. मात्र आता त्याच्या मुंबई वाºया पुन्हा सुरू झाल्या आहेत. याच काळात पिंपरी-चिंचवडच्या बदलीचा आदेश काढल्याचे सूत्रांनी सांगितले.
एका अधिकाºयाने सांगितले की, पिंपरी-चिंचवड मलईदार विभाग आहे. त्यामुळे येथे बदलीसाठी एका अधिकाºयाचे प्रयत्न सुरू होते. त्याची शिफारस वर्ध्यातील या अधिकाºयाने केली. तर, ठाण्यातील एका अधिकाºयाने वहिनीला जागा मिळावी म्हणून एका ज्येष्ठ नेत्याला शिफारस करण्यास सांगितले होते. त्यांची शिफारस डावलली गेली. त्यामुळे मोठे अर्थकारण झाल्याची चर्चा आरटीओत सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

सहा जण होते इच्छुक : मलईदार विभाग असल्याने पिंपरी-चिंचवडसाठी सहा अधिकारी इच्छुक होते. याच ठिकाणी बदली मिळावी म्हणून अडून बसले होते. त्यामुळे दुसºया ठिकाणी बदल्या रखडल्या होत्या. आता ही जागा भरल्यानंतर दुसºया जागांचा मार्ग मोकळा होईल, असे एका अधिकाºयाने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले.

काहीच कल्पना नाही
काम असेल तर अधिकारी येऊ शकतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाबंदी असेल तर त्यांना येता येणार नाही. मात्र वर्ध्यातील तो अधिकारी आला आणि गेला याबाबतची आपल्याला कल्पना नाही, असे आरटीओ विभागातील वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Replacement of another officer in that important position

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.