माहीम जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण, रस्त्यासाठी दोन दिवस लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2020 04:08 PM2020-12-06T16:08:31+5:302020-12-06T16:08:57+5:30

Water Pipe line : जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम रविवारी सकाळी ९ वाजता पूर्ण

Repair of Mahim Water Pipe line completed, road will take two days | माहीम जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण, रस्त्यासाठी दोन दिवस लागणार

माहीम जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण, रस्त्यासाठी दोन दिवस लागणार

googlenewsNext

मुंबई : माहीम येथील मच्छिमार कॉलनी जवळ अरुणकुमार वैद्य मार्गावर मृदंगाचार्य मैदान लगत फुटलेली ५७ इंच व्यासाची मुख्य जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम रविवारी सकाळी ९ वाजता पूर्ण झाले. शिवाय माहिम, छत्रपती शिवाजी महाराज मैदान या भागात सकाळी १० ते ११ या वेळेत विशेष पाणीपुरवठा करण्यात आला.

जी/ दक्षिण आणि जी/उत्तर विभाग अंतर्गत पाणीपुरवठा टप्प्या-टप्प्याने पूर्ववत करण्याचे काम रविवारी सुरु होते. जलवाहिनी दुरुस्ती केलेल्या ठिकाणी खोदलेला रस्ता पूर्ववत करण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे, अशी माहिती पालिकेने दिली. दरम्यान, येथील जलवाहिनी शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास फुटली होती. माहिम, छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे शनिवारी सायंकाळी ७ ते रात्री १० या कालावधीतील पाणी पुरवठा झाला नव्हता.
 

Web Title: Repair of Mahim Water Pipe line completed, road will take two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.