Join us

नाट्यगृहांचे भाडे कमी करणार, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 06:20 IST

The rent of theaters will be reduced : मराठी रंगभूमीदिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी नाट्य निर्माते, कलावंतांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला व त्यांच्या सूचनाही ऐकून घेतल्या.

मुंबई : नाट्यगृहांचे भाडे कमी करण्याच्या मागणीचा सरकार नक्कीच विचार करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिले. शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार नाट्यप्रयोग करा, कलावंतांची अन् प्रेक्षकांचीही काळजी घ्या, असे आवाहन त्यांनी केले.मराठी रंगभूमीदिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी नाट्य निर्माते, कलावंतांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला व त्यांच्या सूचनाही ऐकून घेतल्या. प्रत्येक निर्मात्याने कलाकारांचे चेकअप करावे, स्टेजवर कलाकारांनी अंतर ठेवावे. थिएटरमध्ये सुद्धा नो मास्क नो एन्ट्री असे असले पाहिजे. नाट्यगृहाबाहेरील खाण्याचे स्टॉल्सही नियम पाळतात की नाही हे पाहिले पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :उद्धव ठाकरेमहाराष्ट्र