लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्याचे जलसंपदा मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांच्यासंदर्भात पोस्ट करण्यात आलेले सहा व्हिडीओ प्रथमदर्शनी बदनामीकारक आहेत, असे निरीक्षण नोंदवित उच्च न्यायालयाने ते वादग्रस्त व्हिडीओ हटविण्याचे आदेश दोन यूट्युबर्सना दिले आहेत. या खटल्याची पुढील सुनावणी २० जून रोजी निश्चित करण्यात आली आहे.
गिरीश महाजन यांनी अनिल थत्ते आणि आणखी एका व्यक्तीविरोधात मानहानीचा दावा दाखल केला. यातील सहापैकी पाच व्हिडीओ पत्रकार अनिल थत्ते यांच्या यूट्युब चॅनेलवर आहेत. तर एक व्हिडीओ श्याम गिरी यांच्या यूट्युब चॅनेलवर आहे. एका महिला आयएएस अधिकाऱ्यासोबत महाजन यांच्या वर्तनाबाबत व्हिडीओमध्ये खोटी आणि बदनामीकारक विधाने केली आहेत, असे महाजन यांनी सांगितले.
व्हिडीओमधील विधाने प्रथमदर्शनी बदनामीकारक आहेत, असे स्पष्ट करीत न्या. आरिफ डॉक्टर यांनी सहा व्हिडीओ तातडीने हटविण्याचे निर्देश दिले.