मुंबईकरांना दिलासा...पाणी कपातीचे टेन्शन मिटले ! मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांत ५० टक्के पाणीसाठा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 12:35 IST2025-07-05T12:34:30+5:302025-07-05T12:35:07+5:30
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमध्ये यंदा जुलैच्या सुरुवातीलाच ५० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांची पाणी कपातीची चिंता सध्या तरी मिटली आहे.

मुंबईकरांना दिलासा...पाणी कपातीचे टेन्शन मिटले ! मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांत ५० टक्के पाणीसाठा
मुंबई : मुंबईलापाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमध्ये यंदा जुलैच्या सुरुवातीलाच ५० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांची पाणी कपातीची चिंता सध्या तरी मिटली आहे. दरम्यान, मागील काही वर्षांतील जुलैमधील हा सर्वाधिक पाणीसाठा असून, सातही जलाशयांत सात लाख ३४ हजार ५६२ दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला आहे. अपर वैतरणा धरणात सर्वाधिक म्हणजे ६६ टक्के पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे.
सातही धरणांची पाणी साठवण्याची क्षमता १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर आहे. मात्र, दरवर्षी मे महिन्यात पाणीसाठा खालावत जातो. यंदाही १६ जून रोजी ८.५ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे राखीव साठ्यातून पाणी घेण्याची वेळ मुंबई महापालिकेवर आली होती. मात्र, त्यानंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाल्याचे पालिकेतील सूत्रांनी सांगितले.
पाकिस्तानचा प्रस्ताव भारताने फेटाळला; ठणकावले, प्रथम दहशतवादावर बोला
कोट्यवधी रुपयांची बचत
सध्या सातही धरणांत ५० टक्के पाणीसाठा असून, पावसाचे आणखी दोन महिने शिल्लक आहेत. त्यामुळे धरणातील पाणी साठ्यात वाढ होणार आहे. आता राखीव साठ्यातून पाणी उचलण्याची गरज भासणार नसल्याने पाण्यासाठी महापालिकेचा होणारा कोट्यवधी रुपयांचा संभाव्य खर्च वाचणार आहे.
जलाशय पाणीसाठा टक्के
अपर वैतरणा १,५०,७२० ६६.३८
मोडक सागर ८१,४४६ ६३.१७
तानसा ७०,८६८ ४८.८५
मध्य वैतरणा १,१४,२३० ५९.०२
भातसा ३,०२,१२३ ४२.१३
विहार ११,९३ ४३.०८
तुळशी ३,२४४ ४०.३२
एकूण ७,३४,५६२ ५०.७५
गेल्या वर्षी ४ जुलैला पाणीसाठा ८ टक्के होता. त्या तुलनेत यंदा धरणात चांगला पाणीसाठा आहे. २०२३ मध्ये हाच पाणीसाठा १७ टक्के होता.