Join us

बाधित क्षेत्र ३ हेक्टर मानून मदत; राज्य सरकारचा निर्णय, पूरग्रस्त शेतकऱ्यांना होणार लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 05:51 IST

वाढीव क्षेत्रासाठी ६४८ कोटींची तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पूरग्रस्तांना मदत ही दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंतच्या शेतजमिनीसाठी देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला होता. त्यानुसार वाढीव एक हेक्टरसाठीच्या मदतीपोटी ६४८ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. 

 मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी ही माहिती दिली. आतापर्यंत ८,१३९ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.  राज्यातील सहा लाख ५६ हजार ३१०.८३ हेक्टर क्षेत्रातील बाधित पिकांच्या नुकसानीपोटी सहा लाख १२ हजार १७७ शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.  यापूर्वी या शेतकऱ्यांना २ हेक्टरपर्यंत मदत मंजूर करण्यात आली होती, तर आता अतिरिक्त एक हेक्टरसाठी ही वाढीव मदत देण्यात येणार आहे.

अशी मिळणार मदत...

छत्रपती संभाजीनगर विभाग- बीड, लातूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांतील तीन लाख ५८ हजार ६१२ शेतकऱ्यांच्या तीन लाख ८८ हजार १०१.१३ हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी ३४६ कोटी ३१ लाख ७० हजार रुपये.

नागपूर विभाग - नागपूर, चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यातील तीन हजार ९३१ शेतकऱ्यांच्या सात हजार ६९८.२५ हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी सात कोटी ५१ लाख ७५ हजार रुपये.

नाशिक विभाग -  नाशिक, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील ५३ हजार ८६५ शेतकऱ्यांच्या ५० हजार ६२९ हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी ५९ कोटी ३६ लाख १३ हजार रुपये.

अमरावती विभाग -  अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील एक लाख ७ हजार ६१५ शेतकऱ्यांच्या एक लाख ३९ हजार ४३८.२३ हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी १३१ कोटी ५६ लाख ४७ हजार रुपये.

पुणे विभाग - सोलापूर व सांगली जिल्ह्यातील ८८ हजार १४३ शेतकऱ्यांच्या ७० हजार ४१८.८९ हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी १०३ कोटी ३७ लाख २० हजार रुपये.

कोकण विभाग - ठाणे व पालघर जिल्ह्यातील ११ शेतकऱ्यांच्या २५.३३ हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी दोन लाख १६ हजार रुपये.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Increased Aid for Flood-Affected Farmers: Maharashtra Government's Hectare Expansion

Web Summary : Maharashtra's government will provide aid for crop damage up to three hectares, benefiting flood-hit farmers. ₹648 crore is allocated for the additional hectare, raising the total distributed to ₹8,139 crore. This helps 6.12 lakh farmers with losses across 6.56 lakh hectares.
टॅग्स :राज्य सरकारपूरपाऊसशेतकरी