MMRDA ने आकारलेले ज्यादा शुल्क रद्द करून भाडे कमी करा; भाजपा मंत्र्यांनी दिले निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 17:50 IST2025-12-04T17:49:53+5:302025-12-04T17:50:35+5:30

मंत्रालयात मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाच्या अनुषंगाने विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले होते

Reduce the fare by abolishing the excessive charges levied by MMRDA BJP minister gives instructions | MMRDA ने आकारलेले ज्यादा शुल्क रद्द करून भाडे कमी करा; भाजपा मंत्र्यांनी दिले निर्देश

MMRDA ने आकारलेले ज्यादा शुल्क रद्द करून भाडे कमी करा; भाजपा मंत्र्यांनी दिले निर्देश

वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथे महाराष्ट्र सागरी मंडळाच्या प्रस्तावित कार्यालयीन इमारतीच्या बांधकामासंदर्भात एमएमआरडीएने आकारलेले विस्तारित शुल्क रद्द करून भाडे दर कमी करावेत, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. मंत्रालयात मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाच्या अनुषंगाने विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिवहन व बंदरे विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रम कुमार, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी., मुख्य बंदर अधिकारी कॅप्टन प्रवीण खारा तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत बीकेसी येथील प्लॉट क्र. ४७, जी ब्लॉकवरील महाराष्ट्र सागरी मंडळाच्या कार्यालयीन इमारतीच्या बांधकामाशी संबंधित प्रलंबित विषयांवर सविस्तर चर्चा झाली. एमएमआरडीएने आकारलेल्या शुल्क आणि भाड्यामुळे प्रकल्पावर आर्थिक भार वाढत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. या पार्श्वभूमीवर मंत्री श्री. राणे यांनी राज्यातील सागरी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाच्या असलेल्या या इमारतीच्या बांधकामाला गती देण्यासाठी विस्तारित शुल्क रद्द करून भाडे दर कमी करण्याचा पुनर्विचार करावा, असे निर्देश दिले.

यावेळी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ अंतर्गत समाविष्ट १३ प्रादेशिक समित्यांमधील अतिसंवेदनशील गावांबाबत तसेच नव्याने गठीत ६ प्रादेशिक समित्यांतील महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय विकास महामंडळाच्या विशेष नियोजन प्राधिकरण क्षेत्रातून महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अधिनियमांतून ९+७ गाव वगळण्याबाबतही सविस्तर आढावा घेण्यात आला.

Web Title : मंत्री ने एमएमआरडीए को शुल्क कम करने, किराया घटाने का आदेश दिया

Web Summary : मंत्री नितेश राणे ने महाराष्ट्र समुद्री बोर्ड के बीकेसी कार्यालय भवन के लिए एमएमआरडीए को अतिरिक्त शुल्क माफ करने और किराया कम करने का निर्देश दिया। इसका उद्देश्य राज्य के समुद्री विकास के लिए महत्वपूर्ण परियोजना को गति देना है। क्षेत्रीय योजना और मत्स्य विकास निगम के मामलों पर भी चर्चा हुई।

Web Title : Minister Orders MMRDA to Reduce Charges, Lower Rent

Web Summary : Minister Nitesh Rane directed MMRDA to waive extra fees and reduce rent for the Maharashtra Maritime Board's BKC office building. This aims to accelerate the project crucial for the state's maritime development after concerns about financial burden. Discussions also covered regional planning and fisheries development corporation matters.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.