धारावीत घरोघरी सर्वेक्षणाला सुरुवात ; कमलानगर येथून सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 11:00 AM2024-04-02T11:00:17+5:302024-04-02T11:03:00+5:30

धारावी झोपडपट्टीत घरोघरी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. सोमवारी कमलानगर येथून धारावी सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

redevelopment survey started in dharavi will begin from kamla nagar | धारावीत घरोघरी सर्वेक्षणाला सुरुवात ; कमलानगर येथून सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू

धारावीत घरोघरी सर्वेक्षणाला सुरुवात ; कमलानगर येथून सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू

मुंबई :धारावी झोपडपट्टीत घरोघरी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. सोमवारी कमलानगर येथून धारावी सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली.पहिल्या दिवशी अंदाजे ५० झोपड्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. १८ मार्च रोजी प्रत्येक झोपडीला युनिक नंबर देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. ज्यानंतर लेन्सचे, लेसर मॅपिंग केले गेले. ज्याला ‘लायडर सर्वेक्षण’ असे म्हटले जाते. 

पाच सदस्य पथकांनी रहिवाशांच्या घराला किंवा व्यावसायिक गाळ्यांना भेट दिली. येत्या काही दिवसात या प्रक्रियेला गती देण्यासाठी तैनात केलेल्या पथकांची संख्या वाढवली जाणार आहे. यावेळी जुने रहिवासी दाखले, वीजबिले, मतदार ओळखपत्र, मतदार यादीची प्रत, गुमास्ता परवाना, पालिकेने जारी केलेले हॉटेल परवाना यासारख्या कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित छायाप्रती गोळा करण्यात आल्या. 

१)  मूळ कागदपत्रे स्कॅन करून जागेवर घरमालकांना  परत करण्यात आली. 

२) शिवाय घरमालकांच्या छायाचित्रांसह त्यांच्या कौटुंबिक छायाचित्रांचेही संकलन करण्यात आले.

सर्वेक्षणातील प्रश्न-

सर्वेक्षणात कुटुंबाचा आकार?, सदस्याची शैक्षणिक पार्श्वभूमी?, कमावते सदस्य?, एकूण कौटुंबिक उत्पन्न?, सध्याच्या सदनिकेत किती काळ राहतात?, मातृभाषा व त्यांचे मूळ गाव कोणते? धारावीत नोकरी आहे की धारावीबाहेर?, नोकरीवर जाण्यासाठी कशाचा वापर करतात? असे प्रश्न विचारण्यात आले. ही सर्वेक्षण माहिती राज्य सरकारला सादर केली जाणार असून, शासन त्यावर झोपडीधारकांची पात्रता निश्चित करणार आहे.

Web Title: redevelopment survey started in dharavi will begin from kamla nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.