Join us

मुंबई मेट्रोमध्ये एक हजार पदांची भरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 03:24 IST

अनुभव असणारे किंवा नसणारे आणि शिक्षणाच्या पात्रतेनुसार विविध पदांची ही भरती आहे

मुंबई : मुंबई मेट्रोमध्ये १ हजार ५३ पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. विविध पदांसाठी असलेली ही भरती कायमस्वरूपी असणार आहे.

अनुभव असणारे किंवा नसणारे आणि शिक्षणाच्या पात्रतेनुसार विविध पदांची ही भरती आहे. १६ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरदरम्यान अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पदाप्रमाणे सातव्या वेतन आयोगानुसार पगार देण्यात येईल. या नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्यांना www.mmrda.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येतील.

टॅग्स :एमएमआरडीएमेट्रो