लोकलच्या फेऱ्या वाढवण्यास राज्य सरकार तयार; प्रवाशांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 03:28 AM2020-10-10T03:28:29+5:302020-10-10T06:50:48+5:30

state government on local: उच्च न्यायालयात दिली माहिती

ready to increase the number of local rounds state government to mumbai high court | लोकलच्या फेऱ्या वाढवण्यास राज्य सरकार तयार; प्रवाशांना दिलासा

लोकलच्या फेऱ्या वाढवण्यास राज्य सरकार तयार; प्रवाशांना दिलासा

googlenewsNext

मुंबई : लोकलच्या फेऱ्या वाढविण्यास राज्य सरकारची हरकत नसल्याचे राज्य सरकारतर्फे महाअधिवक्ते आशुतोष कुंभकोणी यांनी उच्च न्यायालयाला शुक्रवारी सांगितले.

अ‍ॅड. कुंभकोणी यांनी शुक्रवारी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाला सांगितले, लोकलच्या फेºया वाढविण्यास राज्य सरकारची हरकत नाही याचा लाभ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त सामान्य प्रवाशांनी घेतला तरी हरकत नाही. मात्र, लोक मास्क वापरत नाहीत. सामाजिक अंतर राखत नाहीत. मास्कने तोंड आणि नाक झाकण्यापेक्षा रुग्णालयात आॅक्सिजन मास्क घालण्यास तयार आहेत.

कुंभकोणी यांनी प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांचे उदाहरण दिले. त्यांना जीव गमवावा लागला कारण त्यांनी त्यांचा माइक एका व्यक्तीला वापरण्यास दिला. त्यानंतर मास्क घातला नाही. त्यांची ही चूक त्यांच्या जिवावर बेतली.

सध्या सरकार एक-एक सेक्टर खुले करत आहे. त्यामुळे लोकल सेवेची मागणी वाढेल. त्यानुसा फेºया वाढवाव्यात, अशी सूचना न्यायालयाने सरकारला केली. सुरक्षा, सामाजिक अंतराचे नियम राखण्यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांवर अंमल करणे, हे सरकारचे कर्तव्य आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या संसर्गाची दुसरी लाट डिसेंबर-जानेवारीत येईल. त्यामुळे आपल्याला तयार राहायला हवे, असेही न्यायालयाने म्हटले.

सर्व एकाच वेळी रेल्वे स्थानकावर जमा होणार नाहीत. पीक अवरमध्ये लोकलमध्ये गर्दी होणार नाही, यासाठी कार्यालयांच्या वेळा वेगळ्या ठेवणे गरजेचे आहे. यात अधिकाºयांसह मंत्र्यांचा सहभागही आवश्यक आहे, असे न्यायालयाने म्हटले. वकिलांनाही अत्यावश्यक सेवेअंतर्गत लोकलने प्रवासास मुभा मिळावी, यासाठी उच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल आहेत. त्यावरील पुढील सुनावणी १९ आॅक्टोबर रोजी होईल.

मध्य, हार्बरच्या प्रवाशांसाठी २२ अतिरिक्त फेºया
मुंबई : अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांसाठी १५ जूनपासून लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर सध्या ४२३ फेºया रोज होतात. गर्दी टाळण्यासाठी आणि फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्यासाठी १० आॅक्टोबरपासून त्यामध्ये आणखी २२ फेºयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता दररोज एकूण ४५३ फेºया धावतील. या २२ फेºयांमध्ये सीएसएमटी ते कसारा, सीएसएमटी ते कर्जत, सीएसएमटी ते पनवेल या गाड्यांच्या फेºया वाढवण्यात आल्या.

Web Title: ready to increase the number of local rounds state government to mumbai high court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.