मुंबई विमानतळावर पोहोचणे आता सहज शक्य होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:05 AM2021-06-01T04:05:37+5:302021-06-01T04:05:37+5:30

अंडरपास, एलिव्हेटेड रस्ता कामाचे भूमिपूजन लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एमएमआरडीए अनुक्रमे टी १ आणि टी २ जोडण्यासाठी अंडरपास ...

Reaching Mumbai Airport will now be easily possible | मुंबई विमानतळावर पोहोचणे आता सहज शक्य होणार

मुंबई विमानतळावर पोहोचणे आता सहज शक्य होणार

Next

अंडरपास, एलिव्हेटेड रस्ता कामाचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : एमएमआरडीए अनुक्रमे टी १ आणि टी २ जोडण्यासाठी अंडरपास व एलिव्हेटेड रस्ते तयार करणार असून, या कामाचे सोमवारी भूमिपूजन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (सीएसएमआयए)च्या टर्मिनल १ (टी १) आणि टर्मिनल २ (टी २)ला जोडण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) एलिव्हेटेड रस्ता आणि वाहनांचा अंडरपास तयार करणार असल्याने लवकरच एक नवी कनेक्टिव्हिटी मिळेल. हे दोन प्रकल्प मुंबई विमानतळाकडे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे (डब्ल्यूईएच)वरून प्रवेश/ एक्झिट पॉईंट सुधारण्यासाठी आहेत.

टी १ ला जोडण्यासाठी एमएमआरडीए ७६ कोटी रुपये खर्चून डब्ल्यूईएचवर प्रवेश नियंत्रणासाठी वाहने अंडरपास (१ पातळी) व उड्डाणपूल रुंदीकरण करणार आहे. सीएसएमआयएच्या डब्ल्यूईएच ते टी १ पर्यंत वांद्रे येथून सुलभ प्रवेशासाठी नियंत्रित अंडरपास प्रस्तावित आहे. येथील कामामुळे वाहतुकीची कोंडी कमी होईल, तर जुहू - विलेपार्ले उड्डाण पुलासाठी दहिसर व वांद्रे दिशेने प्रत्येकी एक लेन रुंदीकरणे प्रस्तावित असून, या उड्डाणपुलाची क्षमता वाढविण्यास मदत होईल. यामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल. एमएमआरडीए १५१.९२ कोटी रुपये खर्च करून डब्ल्यूईएचवर प्रवेश नियंत्रणासाठी वाहने अंडर पास तयार करेल. सीएसएमआयए (टी २) पासून दहिसर व वांद्रे दिशेने डब्ल्यूईएचवर प्रवेश नियंत्रणासाठी दोन नियंत्रित अंडरपास प्रस्तावित आहेत. यामुळे वाहतूक वेगवान होईल आणि मुंबई सुपर फास्ट होईल.

..........................................................

Web Title: Reaching Mumbai Airport will now be easily possible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.