अर्धवट उघड्या असलेल्या दरवाजातून घरात घुसून तरुणीवर बलात्कार; मुंबईतील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 06:31 PM2022-05-13T18:31:31+5:302022-05-13T18:31:38+5:30

मुंबई : धारावीत राहत्या घरात अर्धवट उघड्या असलेल्या दरवाजातून घुसलेल्या दुकलीने १९ वर्षीय विवाहितेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी ...

Raping a young woman who broke into a house through a partially open door; Shocking incident in Mumbai | अर्धवट उघड्या असलेल्या दरवाजातून घरात घुसून तरुणीवर बलात्कार; मुंबईतील धक्कादायक घटना

अर्धवट उघड्या असलेल्या दरवाजातून घरात घुसून तरुणीवर बलात्कार; मुंबईतील धक्कादायक घटना

Next

मुंबई : धारावीत राहत्या घरात अर्धवट उघड्या असलेल्या दरवाजातून घुसलेल्या दुकलीने १९ वर्षीय विवाहितेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली आहे. आरोपींनी बलात्काराचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केली असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी धारावी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहेत.

धारावी परिसरात तक्रारदार १९ वर्षीय तरुणी सासरच्या मंडळींसोबत राहण्यास आहे. मंगळवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तरुणी घरात झोपली असताना, तिचे सासरे दरवाजा न लावता घराबाहेर पडले. दोन अज्ञात व्यक्ती घरात घुसल्या. आरोपींनी चाकूचा धाक दाखवून विवाहितेवर बलात्कार केला. यावेळी एका आरोपीकडून या घटनेचे मोबाइलवर चित्रीकरण सुरू होते. आरोपींनी आपली ओळख लपवण्यासाठी चेहऱ्यावर रुमाल बांधला असल्याचे विवाहितेने पोलिसांना सांगितले आहे.

दोघेही पसार झाल्यानंतर तरुणीने पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला आहे. तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच तिच्या ओळखीच्या व्यक्तीकडेदेखील तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याच्या वृत्ताला धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळवंत पाटील यांनी दुजोरा देत अद्याप आरोपीला अटक केली नसून तपास सुरू असल्याचे सांगितले आहे.

Web Title: Raping a young woman who broke into a house through a partially open door; Shocking incident in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.