Join us
Daily Top 2Weekly Top 5

पार्टीनंतर नशेतच महिलेवर बलात्कार, उच्चभ्रू सोसायटीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 02:28 IST

आरोपीला अटक, उच्चभ्रू सोसायटीतील घटना

मुंबई : मित्रांसोबत दारूची पार्टी उरकून त्यांच्या घरी थांबलेल्या ३६ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना पार्क साइटच्या उच्चभ्रू सोसायटीत घडली. या प्रकरणी अदिप्ता भौमिक (२६) या तरुणाला पार्क साइट पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत,

तक्रारदार घटस्फोटित महिला मालाड परिसरात राहण्यास असून, एका बड्या कंपनीत नोकरीला आहे. पूर्वी एकाच कंपनीत काम करत असताना तिची भौमिकसोबत ओळख झाली. दोघेही दहा महिन्यांपासून एकमेकांना ओळखतात. याच ओळखीतून शनिवारी रात्री त्यांनी लोअर परळमध्ये दारू पार्टी केली. तेथून रात्री ३च्या सुमारास ते पार्क साइट येथील मित्राकडे आले. मित्राचे कुटुंबीय बाहेरगावी गेल्याने घरात त्याची बहीणच होती. तीही झोपली असल्याने ती याबाबत अनभिज्ञ होती. बाहेरच्या खोलीत यांच्या गप्पा रंगल्या. तेथे पुन्हा दारूचा बेत उरकल्यानंतर सकाळी पाचच्या सुमारास भौमिकने तिला घरी सोडले. घरी आल्यानंतर तिने रात्री नशेत भौमिकने तिच्यावर बलात्कार केल्याचे कुटुंबीयांना सांगितले. त्यानुसार, कुटुंबीयांनी मालाड पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपासासाठी हा गुन्हा सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास पार्क साइट पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. त्यानुसार, पार्क साइट पोलिसांनी भौमिकला बलात्काराच्या गुन्ह्यांत अटक केली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :गुन्हेगारीपोलिसबलात्कार