Join us

रणवीर सिंगने गोरेगावमधील दोन फ्लॅट १५ कोटींना विकले, २०१४ मध्ये केली होती खरेदी

By मनोज गडनीस | Updated: November 11, 2023 18:19 IST

अलीकडच्या काळात गोरेगाव परिसरात झालेला हा एक मोठा सौदा मानला जात आहे.

मुंबई - अभिनेता रणवीर सिंग याने मुंबईतल्या गोरेगाव येथील त्याच्या दोन फ्लॅटची विक्री १५ कोटी २५ लाख रुपयांना केली आहे. अलीकडच्या काळात गोरेगाव परिसरात झालेला हा एक मोठा सौदा मानला जात आहे. 

डिसेंबर २०१४ मध्ये रवणीर सिंग याने ओबेरॉय समुहाच्या एका प्रकल्पात या दोन फ्लॅटची खरेदी केली होती. या प्रत्येक फ्लॅटचे आकारमान १३२४ चौरस फूट आहे. ही खरेदी त्याने त्यावेळी प्रत्येकी ४ कोटी ६४ लाख रुपयांना केली होती. या फ्लॅटसोबत सहा पार्किंग स्लॉट देखील मिळाले होते. रणवीर सिंग याने या फ्लॅटमध्ये कधीच वास्तव्य केले नव्हते. अभिनेत्री दिपीका पदुकोण हीच्या सोबत विवाह झाल्यानंतर जुहू या दाम्प्त्याने तब्बल १९९ कोटी रुपयांना आलीशान घराची खरेदी केली आहे. 

टॅग्स :रणवीर सिंगबॉलिवूडसुंदर गृहनियोजन