छ. संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार प्रदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 06:13 IST2025-05-28T06:12:38+5:302025-05-28T06:13:06+5:30
अमित शाह यांच्या हस्ते रणजीत सावरकर यांनी स्वीकारला पुरस्कार

छ. संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार प्रदान
मुंबई : कवी मनाचे महान योद्धे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने सांस्कृतिक विभागाने प्रथमच सुरू केलेला राज्य प्रेरणा गीत पुरस्कार स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ‘अनादि मी, अनंत मी’ या गीताला प्रदान करण्यात आला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंगळवारी वर्षा निवासस्थानी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला. स्वा. सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर आणि नात असिलता सावरकर-राजे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन प्रेरणादायी आहे. प्रचंड बुद्धिमत्तेने त्यांनी स्वतः साहित्य निर्मितीचे कार्यही फार उत्तम केले. ग्रंथ, कविताही त्यांनी लिहिल्या. म्हणूनच त्यांच्या नावाने हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला, असे सांगून मंत्री शेलार म्हणाले, स्वाभाविकच स्वा. सावरकर यांचे ‘अनादि मी, अनंत मी’ प्रचंड आत्मबळ असलेले गीत त्यांनी रचले. त्यामुळेच राज्य शासनाने हा पुरस्कार दिला.