रामदास कदमांची संजय राऊतांसोबत गुफ्तगू, भेटीनंतर केलं मोठं विधान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 10:55 IST2022-05-02T10:54:35+5:302022-05-02T10:55:05+5:30
शिवसेनेचे नाराज नेते रामदास कदम यांनी आज शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली.

रामदास कदमांची संजय राऊतांसोबत गुफ्तगू, भेटीनंतर केलं मोठं विधान!
मुंबई
शिवसेनेचे नाराज नेते रामदास कदम यांनी आज शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. याभेटीमागचं कारण देखील स्वत: रामदास कदम यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसमोर येऊन सांगितलं आहे. माझ्याबाबत अनेक अफवा सध्या उठत आहेत. त्याबाबत माझी भूमिका स्पष्ट करण्यासाठी मी इथं आलो होतो, असं रामदास कदम म्हणाले.
रामदास कदम पक्षातील वादामुळे बॅकफूटवर आले होते. त्यानंतर एकदा पत्रकार परिषद घेऊनही त्यांनी आपली नाराजी जाहीररित्या व्यक्त केली होती. शिवसेनेच्या गटप्रमुखापासूनचा आपला प्रवास उलगडून सांगत आपल्या मनातील शल्यही त्यांनी बोलून दाखवलं होतं. आता संजय राऊत यांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना रामदास कदम यांनी मरेपर्यंत शिवसेनेतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं.
"मी मरेपर्यंत माझ्या खांद्यावर शिवसेनेचाच भगवा असेल आणि माझ्या पक्षाची साथ मी शेवटपर्यंत सोडणार नाही. पण माझ्याबाबत काही अफवा वारंवार समोर येत आहेत. त्यात कोणतंही तथ्य नाही. शिवसेनं मला मोठं केलं आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत भगव्याची साथ सोडणार नाही", असं रामदास कदम म्हणाले.