Rajesh Tope: राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम, राजेश टोपेंची घोषणा; कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 06:34 PM2021-07-29T18:34:05+5:302021-07-29T18:34:21+5:30

Rajesh Tope: राज्यातील २६ जिल्ह्यांमध्ये निर्बंधांमध्ये शिथिलता दिली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आणि ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

Rajesh Tope level three Restrictions in 11 districts of the state Rajesh Tope announced | Rajesh Tope: राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम, राजेश टोपेंची घोषणा; कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश जाणून घ्या...

Rajesh Tope: राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम, राजेश टोपेंची घोषणा; कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश जाणून घ्या...

googlenewsNext

Rajesh Tope: राज्यातील कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेले निर्बंध शिथील करण्यासंदर्भात आजच्या टास्क फोर्ससोबतच्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यातील २६ जिल्ह्यांमध्ये निर्बंधांमध्ये शिथिलता दिली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आणि ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. यावेळी टोपेंनी निर्बंध कायम राहणाऱ्या जिल्ह्यांची नावं देखील जाहीर केली आहेत. 

राज्यातील निर्बंधांवर निर्णय झालाय, फक्त मुख्यमंत्र्यांची सही बाकी; राजेश टोपेंची महत्वाची माहिती

राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये अद्याप रुग्णवाढीचा दर नियंत्रणात आलेला नाही अशा ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम राहणार आहेत. पण त्यात काही प्रमाणात शिथिलता देता येऊ शकते का? याबाबतही बैठकीत चर्चा झाल्याचं राजेश टोपे म्हणाले. या ११ जिल्ह्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा समावेश आहे. 

राज्यातील कोणत्या जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम?
पश्चिम महाराष्ट्र- पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर
कोकण- रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर
मराठवाडा- बीड
उत्तर महाराष्ट्र- अहमदनगर

Web Title: Rajesh Tope level three Restrictions in 11 districts of the state Rajesh Tope announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.