Join us
Daily Top 2Weekly Top 5

Rajesh Tope : मोदींच्या बैठकीला मुख्यमंत्री अनुपस्थित, टोपेंना बोलायची संधी मिळालीच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 22:19 IST

नरेंद्र मोदींनी अनेक राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रकृतीच्या कारणामुळे हजर नव्हते.

मुंबई - देशभरात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्यात येत आहे. सर्वच राज्यातील सरकार कोरोना नियमावलींचे पालन करण्याचे आवाहन करत असून नागरिकांना गर्दी करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. महाराष्ट्रात 15 फेब्रुवारीपर्यंत कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. तर, 5 राज्यातील निवडणुकांच्या प्रचारसंभा आणि रॅलींवरही बंदी घालण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज अनेक राज्यातील मुख्यमंत्र्यांसमवेत व्हर्च्युअल संवाद साधला. यावेळी, महाराष्ट्रातून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची उपस्थिती होती.

नरेंद्र मोदींनी अनेक राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रकृतीच्या कारणामुळे हजर नव्हते. त्यांच्याऐवजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची उपस्थिती होती. मात्र, मोदींसमवेतच्या या बैठकीत राजेश टोपेंनी बोलण्याची संधीच मिळाली नाही. त्यामुळे, त्यांनी आपले म्हणणे लिखीत स्वरुपात मोदींकडे दिले.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 'पोस्ट ऑपरेटिव्ह ट्रीटमेंमुळे बैठकीला हजर राहू शकले नाहीत. कारण, सलग 2/3 तास त्यांना एका जागी बसणं शक्य नव्हतं. त्यामुळे लेखी पत्र देऊन मी महाराष्ट्राची बाजू मांडली, असे टोपे यांनी सांगितले. पंतप्रधानांसमवेतच्या या बैठकीत 8 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलण्याची संधी देण्यात आली. मात्र, मला प्रत्यक्षपणे मोदींसमोर बाजू मांडायची संधी मिळाली नाही. त्यामुळे आम्ही कोविड 19 आणि तिसरी लाट याबाबतचे म्हणणे लेखी स्वरुपात सादर केल्याचेही, टोपेंनी सांगितले. 

महाराष्ट्राच्या वतीने टोपेंनी लेखी स्वरुपात म्हणणे मांडले

ट्रिटमेंट पद्धतीसाठी केंद्रानं मार्गदर्शन करावं, कोविड खर्च काही बाबतीत तफावत आहे. लिक्विड मेडिकल ऑक्सिजन 20 लाख तर मेडिकल पाईपलाईन 15 लाख आहे. जे एम पोर्टलवर या किमती दुप्पट दिसत आहे. याबाबत सुधारित दर केंद्रानं द्यावे आणि उपाययोजनेची SOP द्यावी, अशी मागणी महाराष्ट्राच्या वतीने राजेश टोपेंनी केली. 

टॅग्स :राजेश टोपेनरेंद्र मोदीमुख्यमंत्रीकोरोना वायरस बातम्या