राजेंद्र लोढाची ५९ कोटींची मालमत्ता जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 11:33 IST2025-11-15T11:33:00+5:302025-11-15T11:33:10+5:30
Rajendra Lodha: लोढा समूहामध्ये १०० कोटी रुपयांचा कथित घोटाळा केल्याप्रकरणी सध्या मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या ताब्यात असलेला लोढा समूहाचा माजी संचालक राजेंद्र लोढाची एकूण ५९ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.

राजेंद्र लोढाची ५९ कोटींची मालमत्ता जप्त
मुंबई - लोढा समूहामध्ये १०० कोटी रुपयांचा कथित घोटाळा केल्याप्रकरणी सध्या मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या ताब्यात असलेला लोढा समूहाचा माजी संचालक राजेंद्र लोढाची एकूण ५९ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये रोख रक्कम, बँक खात्यातील रक्कम, मुदत ठेवी, काही संशयास्पद व्यवहारांची कागदपत्रे, स्थावर मालमत्ता आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा समावेश आहे. लोढा यांच्याशी निगडित १४ ठिकाणी ईडीने मंगळवारी छापेमारी केली.
राजेंद्र लोढा हा लोढा समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक लोढा यांचा दूरचा भाऊ आहे. ज्यावेळी लोढा समूहामध्ये राजेंद्र लोढा संचालक म्हणून कार्यरत होता त्यावेळी त्याचा मुलगा साहिल याच्यासोबत संगनमत करत केवळ कागदोपत्री भूखंडांची खरेदी केली, काही भूखंडाची कमी दराने विक्री केली तसेच टीडीआरची देखील कमी दराने विक्री करत कंपनीचे आर्थिक नुकसान केल्याचा ठपका ठेवत त्याच्या विरोधात मुंबईच्या ना. म. जोशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने कंपनीची सुमारे १०० कोटी रुपयांची फसवूणक केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणात मनी लॉड्रिंग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर आता ईडीने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला आहे.