Join us

Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 13:50 IST

राज ठाकरे यांच्या भाषणाने 'विजयी मेळाव्या'ची सुरुवात झाली. यावेळी राज ठाकरे यांनी मीरा-भाईंदर परिसरात एका दुकानदाराला झालेल्या मारहाणीवर देखील भाष्य केले.

Raj Thackeray Speech : तब्बल २० वर्षांनंतर राज आणि उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर एकत्र आले आहे. मराठी भाषेच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधु एकवटले आहेत. ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा' आज वरळी डोममध्ये सुरू आहे. यावेळी मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या भाषणाने या सोहळ्याची सुरुवात झाली. यावेळी राज ठाकरे यांनी मीरा-भाईंदर परिसरात एका दुकानदाराला झालेल्या मारहाणीवर देखील भाष्य केले. तर, त्यांनी समस्त मराठी सैनिकांना एक आदेश देखील दिला.

काय म्हणाले राज ठाकरे?या प्रकरणावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, 'काल परवा मीरा-भाईंदरमध्ये जो प्रकार झाला, त्यानंतर अनेक हिंदी वाहिन्यांवर 'गुजराती माणसाला मारलं' असं सुरू होतं. कुठच्या गुजराती माणसाला मारलं? झाली दोघांची बाचाबाची, त्यात समोरचा गुजराती निघाला, हे काय आधीच माहीत होतं का? त्याच्या कपाळावर गुजराती लिहिलं होतं का?  अर्थात त्यांना मराठी आलंच पाहिजे. अजून तर काहीच केलेलं नाही. मराठी आली पाहिजे याच्याबद्दल वाद नाही.' 

राज ठाकरे यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटले की, 'मराठी प्रत्येकाला आली पाहिजे याच्याबद्दल वाद नाही. पण, विनाकारण उठसूठ मारामारी करायची गरज नाही. पण, जर जास्त नाटकं केली तर, कानाखाली आवाज काढलाच पाहिजे. पण, त्यासाठी चूक त्यांची असली पाहिजे.' 

व्हिडीओ करू नका!'अशी कधीही गोष्ट कराल, त्याचे व्हिडीओ काढू नका. आपल्या-आपल्यामध्येच त्यांना कळलं पाहिजे. मारणारा कधी सांगत नसतो, मार खाणारा सांगत असतो. त्यांना पण सांगू दे', असे राज ठाकरे म्हणाले.

टॅग्स :राज ठाकरेवरळीशिवसेनामनसेमराठी