Join us  

देशात मोदी'राज', नोटाबंदी निर्णयाविरुद्ध राज ठाकरेंकडून अभ्यासू व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2018 10:23 AM

नेहमीच व्यंगचित्रांच्या फटकाऱ्यांतून मोदींना लक्ष्य करणाऱ्या राज ठाकरेंनी यावेळी एका व्हिडीओतून मोदींचा समाचार घेतला आहे. नोटबंदी निर्णयाविरुद्ध राज यांनी आपली भूमिका कशी योग्य होती, हेही या व्हिडीओतून सांगितले आहे.

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला आहे. मोदी सरकारचा नोटबंदी निर्णय कशाप्रकारे चुकीचा आहे, हे राज यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे. राज यांचा हा व्हिडीओ त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केला आहे. तसेच नोटबंदीचा निर्णय 8 नोव्हेंबर 2016 रोजी घेण्यात आला होता. त्यानंतर, तीनच दिवसांत म्हणजे 19 नोव्हेंबर रोजी राज ठाकरेंनी नोटबंदी धोकादायक असल्याचे म्हटले होते, हेही या व्हिडिओतून सांगण्यात आले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या मोदी सरकारवर चालून जायची एकही संधी सोडत नाहीत. यावेळी राज यांनी एका व्हिडीओद्वारे मोदींच्या नोटबंदी निर्णयाचा समाचार घेतला आहे. नोटबंदी निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला कसे नुकसान झाले. विशेष, म्हणजे या निर्णयापूर्वी सरकारने कुठलिही पूर्वतयारी केली नव्हती. तसेच देशातील एटीएम मशिनही नव्या नोटांच्या मांडणीसाठी तयार नव्हत्या, हे सर्व राज ठाकरेंनी आपल्या व्हिडीओतून सांगितले आहे. तर, नुकतेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अहवालातून नोटबंदी निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे. त्याचाही संदर्भ राज यांनी या व्हिडिओतून दिला आहे. 

 

टॅग्स :मनसेराज ठाकरेनरेंद्र मोदीनिश्चलनीकरण