Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 13:57 IST2025-07-05T13:43:14+5:302025-07-05T13:57:49+5:30

Raj Thackeray : हिंदी सक्तीवरुन राज ठाकरे यांनी राज्य सरकारला इशारा दिला.

Raj Thackeray: "You will have power in the Vidhan Bhavan, we will have it on the streets...", Raj Thackeray warns the state government over Hindi compulsion | Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा

Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा

 Raj Thackeray ( Marathi News ) : तब्बल २० वर्षानंतर ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आले. या सभेला मराठी प्रेमींनी प्रचंड गर्दी केली होती. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आल्याने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भाषण करताना राज ठाकरे यांनी या विजयी सभेतून जोरदार टोलेबाजी केली. यावेळी राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीवरुन राज्य सरकारला इशारा दिला. 

Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

"आजचा मेळावा शिवतीर्थावर मैदानात व्हायला हवा होता. पण, पावसामुळे इकडे घेतला. मी कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे असं म्हटलं होतं. जवळपास २० वर्षानंतर आम्ही एका व्यासपीठावर आलो आहोत. जे बाळासाहेब ठाकरे यांना जमल नाही ते म्हणजे आम्हाला एकत्र आणण्याचं देवेंद्र फडणवीस यांना जमलं, असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला. 

राज ठाकरे म्हणाले, हिंदीचा मुद्दा अचानक कुठून आला हे मला कळलंच नाही. हिंदीची जबरदस्ती लहान मुलांवरती करता तुम्ही. कोणाला काही विचारायचं नाही, आमच्या हातात सत्ता आहे. मनात आलं की लगेच लादणार. तुमच्या हातात सत्ता असेल ती विधान भवनात. आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर, असा इशाराही राज ठाकरेंनी राज्य सरकारला दिला.

ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली

राज ठाकरे म्हणाले, आम्ही मराठी मीडियममध्ये शिकलो. आमची मुलं इंग्रजी मीडियायममध्ये शिकली. होय, मग यांना मराठीचा पुळका कसा. बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मीडियममध्ये शिकले आहेत. या दोघांवर मराठीबाबत शंका घ्याल का? लालकृष्ण आडवाणी सेंट पॅट्रीक हायस्कूल ख्रिश्चन मिशनरीमध्ये शिकले. हिंदुत्वावर शंका घेऊ का त्यांच्यावर. कॉन्व्हेंटमध्ये शिकले. दक्षिण भारतात बघा. त्यांना कोण विचारत नाही. उद्या हिब्रू भाषेत शिकेल आणि मराठीचा कडवट अभिमान बाळगेल. काय अडचण आहे?

"...इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’

वरळीत एनएससीआय डोम येथे सुरू असलेल्या या सभेला मराठी प्रेमींनी प्रचंड गर्दी केली आहे. तसेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आल्याने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भाषण करताना राज ठाकरे यांनी या विजयी सभेतून जोरदार टोलेबाजी केली. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, आज मोर्चा निघायला पाहिजे होता. मराठी माणूस कसा सर्व बाजूंनी एकवटतो, याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर उभं राहिलं असतं. पण नुसत्या मोर्चाच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली. आजचाही मेळावा शिवतीर्थावर मैदानात व्हायला पाहिजे होता. मैदान ओसंडून वाहिलं असतं. पण पाऊस आहे. आज २० वर्षांनंतर मी आणि उद्धव एका व्यासपीठावर येत आहोत... जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, असं विधान राज ठाकरे यांनी या सभेच्या निमित्ताने झालेल्या ठाकरे बंधूंच्या ऐक्यावरून केलं.

Web Title: Raj Thackeray: "You will have power in the Vidhan Bhavan, we will have it on the streets...", Raj Thackeray warns the state government over Hindi compulsion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.