Join us
Daily Top 2Weekly Top 5

Raj Thackeray Vs Sanjay Raut: राज ठाकरेंच्या बोचऱ्या टीकेला संजय राऊतांचे शेलक्या शब्दांत प्रत्युत्तर, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 11:39 IST

Raj Thackeray Vs Sanjay Raut: मंगळवारी ठाण्यात झालेल्या उत्तर सभेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर बोचऱ्या शब्दात टीका केली होती. त्यानंतर आता संजय राऊत यांनीही त्याला तितक्याच शेलक्या शब्दात उत्तर दिले आहे.

मुंबई - मंगळवारी ठाण्यात झालेल्या उत्तर सभेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर बोचऱ्या शब्दात टीका केली होती. त्यानंतर आता संजय राऊत यांनीही त्याला तितक्याच शेलक्या शब्दात उत्तर दिले आहे, राज ठाकरे हे आता भाजपाचा भोंगा बनले आहेत.  राज ठाकरे एका द्वेशातून, उद्वेशातून बोलत आहेत. हे तुमचं नसून कुणीतरी आपल्या पक्षाचा भोंगा तुमच्या  तोंडाला लावला आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरे हे भाजपाचा भोंगा बनले आहेत. ईडीची कारवाई होत आहे. त्यातून भाजपाने त्यांना सूट दिली आहे. गेली दीड वर्षे हा भोंगा बंद होता. हिंदुत्वाबाबत आम्हाला समजावण्याची गरज नाही. हिंदुत्व शिवसेनेच्या रक्तात आहे. जेव्हा जेव्हा हिंदुत्वावर हल्ला झालाय. तेव्हा भाजपा आणि भाजपाचे हे  नवे भोंगे समोर नव्हते. आम्ही होतो. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शिवसेना हिंदुत्वासाठी लढत आली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीशी, शिवसेनेशी समोरासमोर लढू शकत नाहीत, असे लोक अशा लोकांना लढण्यासाठी पुढे आणत आहेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

यावेळी शिवराळ भाषेवरून राज ठाकरेंनी केलेल्या टीकेलाही संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले, ते म्हणाले, राज ठाकरे एका द्वेशातून, उद्वेशातून बोलत आहेत. हे तुमचं नसून कुणीतरी आपल्या पक्षाचा भोंगा तुमच्या पक्षाला भोंगा लावला आहे. जर कुणी मुंबईवर, महाराष्ट्रावर थुंकण्याचा प्रयत्न करत असेल तर माझ्यासह प्रत्येक शिवसैनिक अशी भाषा वाचेल. माझ्या शिवराळ भाषेवर तुम्ही जरूर टीका करा. मग तुमची भूमिका बदलली असेल तर या किरीट सोमय्याला तुमच्या शिवतीर्थ बंगल्यावर बोलवा आणि त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करा. त्यांच्यासमोर झुका. आम्हाला काही म्हणायचं नाही. मात्र महाराष्ट्र आणि मुंबईतील मराठी माणूस हे सहन करणार नाही.

हेच किरीट सोमय्या ज्यांना मी शिव्या देतो असा तुमचा आक्षेप आहे. त्यांना अजूनही शिव्या देईन. कारण ते महाराष्ट्रद्रोही आहे. आयएनएस विक्रांत संदर्भात जो घोटाळा समोर आला आहे. देशाच्या संरक्षण व्यवस्थेशी खेळण्याचा, लोकांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न केला.  आयएनएस विक्रांत वाचवा म्हणून कोट्यवधी रुपये घेऊन हडप करणारे भाजपाचे किरीट सोमय्या हे तुम्हाला प्रिय असतील तर त्यांना तुम्ही बोलवा आणि त्यांचा सन्मान करा, असा खोचक सल्लाही संजय राऊत यांनी दिला.  

टॅग्स :संजय राऊतराज ठाकरेमनसेशिवसेना