Raj Thackeray: राज ठाकरेंना धक्का, 'त्या' गुन्ह्यातून मुक्त करण्यासंदर्भातील अर्ज फेटाळला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2022 20:03 IST2022-10-15T20:01:57+5:302022-10-15T20:03:39+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सांगलीतील शिराळा कोर्टानं धक्का दिला आहे. सांगली जिल्ह्यातील शेडगेवाडी फाट्याजवळ मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं.

Raj Thackeray: राज ठाकरेंना धक्का, 'त्या' गुन्ह्यातून मुक्त करण्यासंदर्भातील अर्ज फेटाळला!
मुंबई-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सांगलीतील शिराळा कोर्टानं धक्का दिला आहे. सांगली जिल्ह्यातील शेडगेवाडी फाट्याजवळ मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं. या आंदोलनानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मनसेचे नेते शिरीष पारकर आणि मनसेचे सांगली जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत यांच्यासहित कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. निर्धारित तारखेला कोर्टात हजर राहिले नसल्यामुळे यापूर्वी राज ठाकरे यांच्यावर वॉरंट सुद्धा काढण्यात आलं होतं. मात्र नंतर हे वॉरंट रद्द करण्यात आलं. आता राज ठाकरे यांच्या वकिलांनी राज ठाकरे यांना गुन्ह्यातून मुक्तता करण्याबाबतचा विनंती अर्ज सांगलीतील शिराळा न्यायालयात सादर केला होता. मात्र न्यायालयाने हा मागणी अर्ज फेटाळून लावला आहे.
नेमकं प्रकरण काय?
२००८ साली भारतीय रेल्वे मध्ये मराठी तरुणांना नोकरीची संधी मिळावी म्हणून राज्यभर मनसेने आंदोलन केलं होतं. याबद्दल कल्याणमध्ये राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना अटकही करण्यात आली होती. त्यानंतर राज्यभर मनसे कडून ठिकाणी आंदोलन करण्यात आली. सांगली जिल्ह्यातील शेडगेवाडी या ठिकाणी मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी बंद पुकारला होता. व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास भाग पाडणं आणि आंदोलन केल्याच्या पार्श्वभूमीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी 'वर्षा' बंगल्यावर, नेमकी कोणत्या मुद्द्यावर चर्चा?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिरीष पारकर, जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्यासहीत काही कार्यकर्त्यांवर बेकायदेशीररित्या जनसमुदाय गोळा करणे, शांतता भंग करणे, चुकीच्या मार्गाने हुसकावणे, घोषणाबाजी करणे याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
राज ठाकरे मुख्यमंत्री भेटीत तुकाराम मुंढेंनी लक्ष वेधलं, दोन मिनिटांत ब्लड टेस्ट अन् बरंच काही...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिरीष पारकर यांच्यावतीने न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा घडतेवेळी ते दोघेही उपस्थित नव्हते, तर ते अन्य गुन्ह्या प्रकरणी अटकेत होते. त्यांच्याविरुध्द गुन्हा चालविण्याइतपत पुरावा देखील नाही. त्यामुळे त्यांची सदर गुन्ह्यातून मुक्तता करण्यात यावी असा अर्ज केला होता. पण न्यायालयानं अर्ज फेटाळून लावला आहे.