Join us
Daily Top 2Weekly Top 5

त्याची मला रुखरुख लागेलच... राज ठाकरेंचे मनसैनिकांना खुले पत्र; आणखी काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 16:38 IST

Raj Thackeray open letter: सध्या राज आणि उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनाच्या चर्चांना वेग आला आहे.

Raj Thackeray open letter: महाराष्ट्रात राजकारणात कधी काय घडेल याचा कुणालाही अंदाज बांधता येणे शक्य नाही. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ राजकीयदृष्ट्या एकत्र येणार का, यावर जोरदार चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांंना याबद्दल विचारले असता, जनतेच्या मनात आहे तेच घडेल, असे सूचक उत्तर त्यांनी दिले. राज ठाकरेंचे मनसैनिकही या मनोमिलनाबाबत आशावादी आहेत. आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस १३ जूनला तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस १४ जूनला असतो. त्यामुळे या मनोमिलनाच्या चर्चांदरम्यान दादरच्या सेनाभवना समोर आदित्य आणि राज यांनी वाढदिवसाच्या एकत्रित शुभेच्छा देणारे पोस्टर लावण्यात आले आहेत. याच दरम्यान, राज ठाकरे यांनी आपल्या वाढदिवसासंबंधी मनसैनिकांनी एक खुले पत्र लिहिले आहे. आपल्या वाढदिवशी कुणीही शिवतीर्थवर भेटण्यासाठी गर्दी करू नये, असे त्यांनी म्हटले आहे.

राज यांनी लिहिलेले पत्र असे आहे की...

माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांनो आणि हितचिंतकांनो, सस्नेह जय महाराष्ट्र!

येत्या १४ जून २०२५ ला म्हणजे अर्थातच माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आपली भेट होणं शक्य नाही, कारण या दिक्शी मी सहकुटुंब मुंबई बाहेर जात आहे. तुमच्या आणि किंवा इतरांच्या मनात हा प्रश्न येईल की मी वाढदिवस साजय का करणार नाहीये ? काही विशेष कारण आहे का ? इत्यादी पण मनापासून सांगतोय की बरतर असं कोणतंच कारण नाहीये. त्यामुळे येत्या १४ जूनला तुम्हाला भेटता येणार नाही, याचे कोणतेही अर्थ काढू नका.

गेली अनेक दशकं माझ्या वाढदिवसाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही सभळे जणं येवा, तुमच्याशी त्या दिवशी बोलणं होत नाही पण तुमचं दर्शन, तुमच्या अनेकांशी होणारी भेट हि ऊर्जा देणारी असते. मी आयुष्यात सर्वात जास्त काही कमावलं असेल तर तुम्हा सर्वांच अफाट प्रेम ! आणि या प्रेमाबद्दल मी तुमचा आयुष्यभर ऋणी आहे आणि पुढे देखील यहीन. या वाढदिवसाला तुमची भेट होणार नाही, यामुळे त्याची मला रुखरुख लागेलच!

पण लवकरच मी तुमच्या भेटीला येईन. महाराष्ट्र सैनिकांना भेटायला, त्यांचे दर्शन घ्यायला म्हणून मी येईन तेव्हा आपली भेट होईलच. बाकी तुमच्या शुभेच्छा माझ्यासोबत आहेतच आणि त्या कायम राहतील याबद्दल तिळमात्र शंका माझ्या मनात नाही.

माझ्या वाढदिवसाच्या दिक्शी तुम्ही तुमच्या भागात काही लोकोपयोगी कार्यक्रम राबवलेत तरी माझा वाढदिवस तुम्ही साजरा केलात असं मी मानेन. त्यामुळे या वर्षी शिवतीर्थावर येऊ नका, आपण लवकर भेटू. महाराष्ट्राची, मराठी माणसाची तसेच तुमची आणि तुमच्या कुटुंबीयांची काळजी घ्या.

टॅग्स :राज ठाकरेमनसेउद्धव ठाकरेआदित्य ठाकरेशिवसेना